फायर, म्हणजे ‘फायनान्शिअल इंडिपेंडंट, रिटायर अर्ली’ एक आर्थिक नियोजनाचे सूत्र आहे, जे तरुण वयात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि लवकर रिटायर्ड होण्याचा कामाचा फॉर्म्युला आहे. FIRE मॉडेल कसं काम करते समजून घेऊया.
काय आहे FIRE मॉडेल?
आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग (50% ते 70%) बचत आणि गुंतवणुकीसाठी राखून ठेवायचा आणि काही वर्षांतच उर्वरित आयुष्य आरामात जगण्यासाठी पुरेशी संपत्ती जमा करावी, हीच FIRE म्हणजे ‘फायनान्शिअल इंडिपेडन्स आणि अर्ली रिटायरमेंट’ या गुंतवणूक फॉर्म्युलामागील कल्पना आहे.
जास्तीत जास्त बचत करा : नोकरदार लोक आपल्या कमाईपैकी सरासरी केवळ 20-30% बचत करतात, पण FIRE मॉडेलनुसार 50% पेक्षा जास्त बचत करणे आवश्यक आहे. म्हणजे खर्च कमी आणि साधी जीवनशैली जगले पाहिजे.
हुशारीने गुंतवणूक करा : केवळ बचत करणे पुरेसे नाही. केवळ बचत करायची नाही तर, चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी ही रक्कम म्युच्युअल फंड, शेअर्स, SIP, रिअल इस्टेट इत्यादींमध्ये गुंतवली जाते.
आर्थिक ध्येये निश्चित करा : निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहिन्याला किती खर्च करायचा आहे, याची लिस्ट तयार करा. मग ध्येय गाठण्यासाठी ‘25x नियम’ वापरा म्हणजे तुमच्या वार्षिक खर्चाच्या 25 पट गुंतवणुकीचा निधी तयार करा.
अतिरिक्त उत्पन्न मिळवा : FIRE अधिक वेगाने साध्य करण्यासाठी फ्रीलान्सिंग, ब्लॉगिंग, स्टॉक डिव्हिडंड किंवा भाड्याचे उत्पन्न यांसारखे पर्याय निवडू शकता.
Safeguard Tariff Explained: भारत-अमेरिकेत व्यापार युद्ध पेटले, काय आहे क्वार्ट्झ टॅरिफ? ट्रम्पच्या मनमानी 50 टक्के टॅरिफविरुद्ध भारताची WTO कडे धावलक्षात घ्या की FIRE मॉडेल प्रत्येकासाठी नाही, तर हा गुंतवणूक फॉर्म्युला अशा लोकांसाठी आहे जे शिस्तीने पैशांची बचत आणि गुंतवणूक करू शकतात व लवकर निवृत्त होऊ इच्छित आहेत, विशेषतः तरुण व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी किंवा ज्यांना लवकर आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे त्यांच्यामध्ये लोकप्रिय होत आहे.
पुण्यातील जोडपे लवकरच रिटायर होणार
पुण्यातील 38 वर्षीय जोडपे स्थावर मालमत्ता, भारतीय इक्विटी आणि म्युच्युअल फंड, अमेरिकन स्टॉक्स, रोख रक्कम आणि सेवानिवृत्ती बचतीमधून अंदाजे 11.5 कोटींची संपत्ती जमवली. दिवसेंदिवस कामाचा वाढता ताण आणि आरोग्याच्या समस्यांनी या जोडप्याला आर्थिक प्राधान्यक्रमांचा पुनर्विचार करणे भाग पडले व आणखी दोन ते तीन वर्षे काम करून लवकर निवृत्त होण्याचा विचार करत आहेत.
Gold Silver Price Fall: ‘मौल्यवान’ सोने दरातील तेजीला ब्रेक, भारतासह विदेशात किमतीत घसरण सुरू; चांदीचे दर आपटलेDINK म्हणजे ‘डबल इन्कम नो किड्स’ असलेलं हे जोडपं आपल्या जीवनशैलीवर वार्षिक अंदाजे 22 लाख रुपये खर्च करतात. यापैकी त्यांच्या संपत्तीमध्ये स्थावर मालमत्तेत अंदाजे 3.2 कोटी रुपये, भारतीय इक्विटी आणि म्युच्युअल फंडात 1.8 कोटी, अमेरिकी स्टॉक्समध्ये 5 कोटी रुपये आणि कॅश व सेवानिवृत्ती बचतीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा समावेश आहे.
तिशीच्या उत्तरार्धातील इतर जोडप्यांप्रमाणे मुलांचं शिक्षण, लग्न किंवा कुटुंब वाढवण्याशी संबंधित इतर बड्या खर्चांसाठी रिटायरमेंट निधी उभारण्याची गरज नाही. पण तरीही त्यांच्या जबाबदाऱ्या संपलेल्या नाही. दोघांचे पालक (आई-वडील) निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या पूर्णपणे अवलंबून आहेत, म्हणजे जोडप्याला पुरेशी आर्थिक सुरक्षा टिकवून ठेवायची आहे, जेणेकरून लवकर नोकरीतून रिटायरमेंट घेतली तरीही आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करू शकतील.

