Sunita Ahuja And Govinda Daughter : सुनीता अहुजानं एका जुन्या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितलेला. गोविंदा आणि सुनीताला १९९७ मध्ये एक मुलगी झालेली. मात्र, तिचा जन्माच्या तीन महिन्यातच मृत्यू झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सुनीतानं अभिनेत्री कोमल राणीचं गोविंदासोबत अफेअर असल्याचा आरोप केला आहे. गोविंदा आणि सुनीता यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा होत असताना त्यांच्या आयुष्यातील एक भावूक प्रसंग समोर आला आहे. गोविंदा आणि सुनीता यांच्या एका मुलीचं निधन झालेलं. त्याबद्दल सुनीतानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
सुनीतानं सांगितला कठीण काळ
गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ मध्ये लग्न केलं असून १९८९ मध्ये त्यांना पहिली मुलगी टीना झाली. टीनाच्या जन्मानंतर गोविंदा आणि सुनीतानं त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता. त्यानंतर दोघांच्या आयुष्यात कठीण काळ अआलेला. १९९७ मध्ये गोविंदा आणि सुनीता यांना आणखी एक मुलगी झालेली. मात्र, जन्माच्या अवघ्या तीन महिन्यात तिचं निधन झालं. सुनीता म्हणाली की, ‘मला दुसऱ्यांदा झालेली मुलगी ९ महिने पूर्ण व्हायच्या आधीच झालेली. त्यामुळे तिची पूर्णपणे वाढ झालेली नव्हती, तिच्या फुप्फुसाची पूर्ण वाढ झाली नव्हती.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
‘तिला फुप्फुसांचा त्रास असल्यामुळे एका रात्री तिची तब्येत बिघडली. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिनं माझ्या कुशीतच प्राण सोडला. त्यावेळी माझी मुलगी फक्त तीन महिन्यांची होती. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. ते बाळ नीट राहिलं असतं तर आज मला दोन मुली आणि एक मुलगा असला असता.’ असं सुनीतानं सांगितलेलं. उषा काकडे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनीतानं हा कठीण काळ सांगितलेला.
एका जुन्या मुलाखतीमध्ये गोविंदानं मृत लेकीचा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला होता. आपल्या मुलीचं पार्थिव नर्मदा नदीत विसर्जित करण्यास त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं. गोविंदा म्हणालेला की, नवरात्रीच्या नवव्या दिवशी तो आपल्या मृत मुलीला घेऊन नर्मदा नदीकडे निघालेला. वाटेत त्याला एक महिला भीक मागताना दिसली. तिच्या हातातही तिचं बाळ होतं. गोविंदांच्या हातातील निष्प्राण बाळ तिच्या नजरेस पडताच तिनं आपल्या बाळाला घट्ट कवटाळलं आणि तिथून लगेच दूर पळून गेली.
Shubhavi Gupte : ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती! अवघ्या 20व्या वर्षी स्वबळावर घेतली कार, व्यक्त केल्या भावना या प्रसंगानं गोविंदाला आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला. गोविंदा म्हणालेला, ‘तिनं आपल्या बाळाला असं जवळ घेतलं आणि माझ्यापासून दूर पळाली. त्या वेळी मला असं वाटलं की मी भिकारी आहे आणि ती श्रीमंत आहे. आयुष्य असंच असतं. ते तुम्हाला कधी कधी स्टारडमच्या शिखरावर असतानाही भिकाऱ्यापेक्षा वाईट परिस्थिती दाखवतं, तर कधी अत्यंत गरिब परीस्थितही राजापेक्षा मोठ्या गोष्टींचा अनुभव देतं’
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा