Headlines

Shabnam Sinha Airtel Payments Bank’s Chairperson Work Experience ; मित्तल यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला पूर्णविराम! Airtel Payments बँकेच्या चेअरमन पदावर नवी नियुक्ती, कोण आहेत डॉ. शबनम सिन्हा?


एअरटेल पेमेंट्स बँकेच्या चेअरमन पदी आता नव्या व्यक्तीची नियुक्ती होणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून डॉ. शबनम सिन्हा बँकेच्या महत्वाच्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. तर एअरटेल पेमेंट्स बँकेचे सध्याचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी ते पदाचा कार्यभार सोडणार आहेत. त्यांच्या जागी डॉ. शबनम सिन्हा यांची नियुक्ती झाली असून त्यांना 30 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी 15 वर्षे वर्ल्ड बँकेत काम केले आहे.

सध्या डॉ. शबनम सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या इंडिपेंडेंट डिरेक्टर आहेत. तसेच त्या स्पेशल कमिटी ऑन मॉनिटरिंग फ्रॉड्सच्या चेअरपर्सन आहेत. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट समितिच्या त्या सदस्या आहेत. त्यांना ऑडिट, रिस्क, तंत्रज्ञान, ईएसजी, स्टेकहोल्डर गवरनन्स तसेच फ्रॉड मॉनिटरिंग या क्षेत्रांत बोर्ड लेवल अनुभव आहे. त्याचसह त्या इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी समितिच्याही सदस्या आहेत. त्यांनी ह्युमन कॅपिटल तसेच नॉमिनेशन क्षेत्रांतही बोर्ड अनुभव घेतला आहे. आता डॉ. सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या चेअरमन पदासाठी नियुक्त होणार असून त्यासाठी आरबीआईची मंजूरी आवश्यक आहे.

डॉ. शबनम सिन्हा यांना फार मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्यांनी युरोप तसेच मध्य आशियातही कामे केली आहेत. त्याचबरोबर आफ्रिकेतही कामे केली आहेत. त्यांना कामाचा दांडगा अनुभव असून 2010 ते 2025 या काळात त्या लीड स्पेशालिस्ट होत्या. त्यांना बँकिंग, पब्लिक पॉलिसी, रिस्क मॅनेजमेंट तसेच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात अनुभव आहे.

या अगोदर डॉ. शबनम सिन्हा यांनी 2007 ते 2010 दरम्यान IL&FS Education & Technology Services कंपनीच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कंपनीचा नफा-तोटा, आर्थिक व्यवस्थापन तसेच खाजगी भागीदाऱ्या, सरकारी भागीदाऱ्यांच्या व्यवस्थापनांची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी यूएसएआयडी मध्ये सीनियर प्रोग्रामच्या मुख्य सल्लागार पदी काम केले आहे. भारत सरकार तसेच एनसीईआरटीसाठी 10 वर्षे काम केले आहे.

Maharashtra Times8th Pay Commission Pension Hike: तीन ते चार पट पेन्शन वाढीचा प्रस्ताव: ज्यांना 50 हजार अपेक्षित, त्यांना 1.91 लाख मिळू शकतो; पगारनिहाय पाहा पेन्शनचं गणितकोण आहेत सुनील भारती मित्तल?

सुनील भारती मित्तल यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या Non-Executive चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. ते भारती एन्टरप्राइजेज कंपनीचे चेअरमन आहेत. 1976 साली त्यांनी भारती एन्टरप्राइजेजची स्थापना केली होती. टेलीकॉम क्षेत्रातील त्यांच्या योगदानांमुळे त्यांना जीएसएमए लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत