Headlines

वर्ल्ड कपमध्ये पुन्हा IND vs PAK थरार, भारतासाठी निर्णायक लढत! महामुकाबला कधी, कुठे LIVE पाहता येणार?


India vs Pakistan Hockey WC 2026 : हॉकी वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल.

Hockey WC 2026 ind vs pak
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेट असो वा हॉकी. जेव्हा क्रीडा जगतात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. असाच एक हायव्होल्टेज आणि अंगावर काटा आणणारा थरार आता पुन्हा एकदा हॉकीच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ ( FIH Hockey World Cup 2026 ) मधील पूल ‘डी’ च्या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत. इंग्लंडकडून २-४ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी हा सामना आता अत्यंत निर्णायक आणि ‘करा किंवा मरा’ असा बनला आहे.

कधी आणि कुठे रंगणार महामुकाबला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होल्टेज सामना बुधवारी (१९ ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. नेदरलँड्समधील अमस्टेलवीन येथील प्रसिद्ध वेगेनर हॉकी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामुकाबला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होईल.

Maharashtra TimesNational Sports Awards 2025 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये महाराष्ट्राच्या विदित-दिव्याचा डंका, एकूण 17 खेळाडूंना अर्जुन, खेलरत्नचा मानकरी नाही; जीवनगौरव, द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला?

समीकरण काय सांगते? भारताला विजय का आवश्यक?

भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका विजयासह आणि एका पराभवासह संघ ३ गुणांवर आहे. सध्या भारतीय संघ पूल ‘डी’ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ६ गुणांसह इंग्लंडने आधीच पुढील फेरीत आपले स्थान पक्के केले आहे, तर पाकिस्तान आणि वेल्सच्या खात्यात सध्या प्रत्येकी १ गुण आहे.

त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारल्यास भारताचे ६ गुण होतील आणि संघ कोणत्याही ‘जर-तर’च्या समीकरणाशिवाय थेट पुढील फेरीत धडक मारेल. जर हा सामना ड्रॉ राहिला, तर भारताचे ४ गुण होतील. अशा वेळी वेल्स आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचा निकाल निर्णायक ठरेल. इंग्लंड जिंकल्यास भारत पुढच्या फेरीत पोहोचेल, मात्र वेल्स जिंकल्यास गोल फरकावरून संघाचे भवितव्य ठरेल.

Maharashtra TimesKavya Maran : शुभमंगल सावधान! हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली, विदेशात बांधणार लग्नगाठ?

भारताचा पराभव झाल्यास हा भारतासाठी सर्वात मोठा धक्का असेल. जर भारत या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाला, तर पाकिस्तानचे ४ गुण होतील आणि भारत ३ गुणांवरच अडकेल. अशा स्थितीत भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण होईल.

सामना लाईव्ह कुठे पाहाल?

भारतीय क्रीडाप्रेमींसाठी या एफआयएच हॉकी वर्ल्ड कप २०२६ च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’वर केले जात आहे. टीव्हीवर ‘स्टार सिलेक्ट २’ आणि ‘स्टार स्पोर्ट्स खेल’ या चॅनेल्सवर हा सामना पाहता येईल. तसेच, डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच मोबाईलवर सामना पाहायचा असल्यास ‘जिओ हॉटस्टार’ (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

याशिवाय, ‘डीडी स्पोर्ट्स’वर (DD Sports) या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे डीडी फ्री डिश वापरणाऱ्या प्रेक्षकांना हा महामुकाबला अगदी मोफत पाहता येणार आहे.

Maharashtra TimesAyush Shetty : आत्मविश्वास असावा तर असा! चीनचा जगज्जेता शि युकीला 21 वर्षांच्या आयुष शेट्टीने सांगून हरवलं, भारताच्या छाव्याचा जगभरात डंका

हॉकी वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघ

  • गोलरक्षक: मोहित एचएस, सूरज करकेरा.
  • डिफेंडर्स: हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच.
  • मिडफील्डर्स: मनप्रीत सिंग, राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे, हार्दिक सिंग, नीलकंठ शर्मा, विवेक सागर प्रसाद.
  • फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, शिलानंद लाकडा, सुखजीत सिंग, अभिषेक.
सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा