Headlines

Amitabh Bachchan : ‘सेटवर उशिरा पोहोचल्यानं मला दिग्दर्शकानं सिनेमातून काढलं’, बिग बींनी सांगितला संघर्षकाळ; केलेला टीकेचा सामना


Amitabh Bachchan On His Struggle : अमिताभ बच्चन यांना आज मेगास्टार म्हटलं जातं. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण, अमिताभ यांचा इंडस्ट्रीतील प्रवास सोपा नव्हता.

Amitabh Bachchan On Struggle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास कधीच सोपा नव्हता. आज लोक त्यांना मेगास्टार म्हणतात, पण अनेकदा अमिताभ यांनाही नकाराचा आणि खडतर संघर्षाचा सामना करावा लागला होता. ‘ कौन बनेगा करोडपती १८ ‘ मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमधील सुवर्णपदक विजेते लव्हलिना बोरगोहेन, जसवंत कुमार, शर्मिला धनखर आणि अस्मिता डे यांच्याशी संवाद साधताना बिग बींनी त्यांच्या अभिनयक्षेत्रातील सुरुवातीच्या दिवसांतील अडचणी सांगितल्या.

अमिताभ बच्चन यांनी सांगितला संघर्षकाळ

आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, त्यांनाही सुरुवातीला खूप नकार आणि कठोर टीकेचा सामना करावा लागला होता. सुरुवातीच्या काळात त्यांना सांगण्यात आलं होतं की, त्यांची उंची खूप जास्त आहे. शो दरम्यान अस्मितानं बिग बींना विचारलं, ‘ज्याप्रमाणे खेळाडूंना प्रशिक्षणादरम्यान चुकांसाठी प्रशिक्षकांकडून ओरडा मिळतो, त्याचप्रमाणे कलाकारांनाही चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकांकडून कानउघाडणी सहन करावी लागते का?’

Boman Irani : मी त्याचा मुलगा असल्यासारखा रितेश माझ्याशी बोलतो, बोमन इराणींनी सांगितला किस्सा

चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना अमिताभ बच्चन यांनाही टीकेला सामोरं जावं लागलेलं. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. बिग बी म्हणाले, ‘मी खूप ओरडा खाल्ला आहे. सुरुवातीला लोक म्हणायचे, ‘तुला अभिनयाबद्दल काहीच माहिती नाही, तू खूप उंच आहेस, घरी जा.’ अनेकदा सिनेमात काम मिळाल्यानंतरही अमिताभ यांना टीकेचा सामना करावा लागलेला. अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आम्ही सर्वजण सहसा वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण एकदा मला उशीर झाला होता. दिग्दर्शक सेटच्या बाहेर वाट पाहत होते आणि मी दुसऱ्याच्या गाडीनं आलो. मी सेटवर उशिरा पोहोचल्यानं दिग्दर्शकानं मला सिनेमातून काढून टाकलं.’

Maharashtra TimesAjinkya Deo : कॅमेराची भीती, पण वडिलांच्या स्वप्नाखातर अभिनयात एन्ट्री; आज मराठी इंडस्ट्रीतलं नावाजलेलं नाव, लवकरच झळकणार रणबीर कपूरच्या सिनेमात

व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून सुरुवात

अमिताभ बच्चन ५० वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीचा भाग आहेत. अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं. १९६९ मध्ये, त्यांनी मृणाल सेन यांच्या ‘भूतन शोम’ या कमी बजेटच्या चित्रपटाला आपला भारदस्त आवाज दिला होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा