Chandrapur News: सुरुवातीला एकट्याने सुरू केलेल्या या कामाला नंतर ग्रामस्थांची साथ मिळाली आणि त्यांनी मिळून थेट रस्ताच उभारला. तुळशीराम गेडाम हे या ध्येयवेड्याचे नाव.

बिहारमधील ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांच्या कहाणीची आठवण देणारी ही घटना. दोन महिन्यांपूर्वी; १४ जून रोजी तुळशीराम यांची गर्भवती पत्नी संगीता यांना प्रसूत वेदना सुरू झाल्या. असह्य वेदना होत असताना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला आणि संगीता यांचा मृत्यू झाला.
Sangli Crime : कचरा टाकण्यावरुन वाद, पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, बायकोचा जागीच मृत्यू; नवऱ्याचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवलीपत्नीच्या मृत्यूनंतर तुळशीराम यांनी आणखी वाट न पाहता गावाला रस्ता मिळवून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले आणि रस्त्याचे महत्त्व पटवून दिले. ‘सरकारच्या भरवशावर बसून राहण्यापेक्षा आपण स्वतः रस्ता तयार केला पाहिजे. आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या तीच वेळ इतर कोणावरही येऊ शकते’, असे त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले.
Jalgaon News : ग्रामसभेत वादाचा थरार, ग्रामस्थांची प्रश्नांची सरबत्ती; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूतुळशीराम यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासीदिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी श्रमदानाला सुरुवात केली. पाहता पाहता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला. हा रस्ता उभारण्यासाठी गावातील सुमारे २० कुटुंबे एकत्र आली. याच गावातील लोक यापूर्वी रुग्णांना झोळीमध्ये घेऊन रुग्णालयापर्यंत नेत होते. आता रस्ता तयार झाल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसली तरी बैलगाडी किंवा इतर वाहनाच्या मदतीने रुग्णांना रुग्णालयात नेणे शक्य होणार आहे. प्रशासनाने आता सिमेंट रस्त्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

