Headlines

Housing Society Penalty Rules; हाउसिंग सोसायटीत भाडेकरूने नियम मोडला, तर दंड घरमालकाने भरायचा की भाडेकरूने? सोसायटीच्या दंडाचे नियम पाहा


Tenant vs Landlord: आपल्या देशातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये (हाऊसिंग सोसायटी) रात्री उशिरापर्यंत वाजणारे डीजे, पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये होणारे वाद, पसरलेला कचरा किंवा लिफ्ट आणि पार्किंगच्या जागा यांसारख्या मालमत्तेचे नुकसान अनेकदा वादाचे मुख्य केंद्र बनतात. अशा परिस्थितीत सोसायटीची रहिवासी कल्याण संघटना – RWA – नियम मोडल्याबद्दल मोठा दंड आकारते.

अशा प्रकारणांमध्ये नियम भाडेकरू मोडतो पण, प्रश्न निर्माण होतो की आता दंड कोण भरणार — घरमालक की चूक करणारा भाडेकरू?या प्रश्नाचे उत्तर सरळ नाही, पूर्णपणे उल्लंघनाच्या स्वरूप आणि कराराच्या अटींवर अवलंबून असते.

Maharashtra TimesNASDAQ Trading Hours: अमेरिकी शेअर बाजार आता झोपणार नाही, 23 तास सुरू राहणार जगातील सर्वात मोठे एक्सचेंज; गुंतवणूकदारांना नव्या संधीचे दार उघडणार

सोसायटी नेहमी फ्लॅट मालकांवर दंड का लावते?

गृहनिर्माण संस्थेचे कायदेशीर संबंध केवळ मालमत्तेच्या नोंदणीकृत मालकाशी असतात, भाडेकरूशी नाही. त्यामुळे, सोसायटीच्या छोट्या-मोठ्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट फ्लॅट मालकाला दंड आकारला जातो आणि भाडेकरूची चूक असली तरीही, bylaws नुसार घरमालकच प्रामुख्याने जबाबदार असतो.

सोसायटी व्यवस्थापन भाडेकरूला थेट ताकीद देऊ शकते, पण घरमालकालाच दंड आकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, भाडेकरूच्या चुकांचा घरमालकाला बसू फटका नये, याची खात्री करण्यासाठी रेंट अग्रीमेंट किंवा लीव्ह-अँड-लायसन्स करारात स्पष्ट अटी नमूद करणे महत्त्वाचे आहे.

Maharashtra TimesEconomic Challenges: धोक्याची घंटा! जगाला उदंड झाले कर्ज, तेलानंतर आता 2008 सारखं संकट दाराशी; अमेरिकेसह मोठ्या अर्थव्यवस्था जेरीसभाडेकरारात हाऊसिंग सोसायटीचे नियम मोडल्यास आकारल्या जाणाऱ्या कोणत्याही दंडासाठी भाडेकरू जबाबदार असेल, असे स्पष्ट नमूद केलेले असेल तर, घरमालक संस्थेला भरलेला दंड भाडेकरूकडून वसूल करू शकतो. ही रक्कम एकतर भाडेकरूकडून स्वतंत्र वसूल केली जाऊ शकते किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमधून वजा केली जाऊ शकते. करारातील कलम घरमालकाला कायदेशीर संरक्षण देऊ शकते.

लक्षात घ्या की सोसायटीकडून आकारला जाणारा प्रत्येक दंड वैध ठरत नसतो. सोसायटीचे bylaws आणि लागू कायदे दंडाचा आधार असतात. अवाजवी किंवा अयोग्य दंडाला उपलब्ध तक्रार किंवा अपील प्रक्रियेद्वारे आव्हान दिले जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमचा फ्लॅट भाड्याने देत असल्यास Rent Agreement मध्ये सोसायटीचे नियम आणि दंडाची जबाबदारी यांचा स्पष्ट समावेश करायला विसरू नका.

Maharashtra TimesGratuity Calculator: 5 वर्ष काम केल्यानंतर 20000 च्या बेसिक सॅलरीवर किती ग्रॅच्युइटी मिळेल? एक छोटा फॉर्म्युला सांगेल सगळा हिशोब

सोसायट्या कोण-कोणत्या कारणांवरून दंड आकारते

  • निश्चित केलेल्या पार्किंग स्पेसव्यतिरिक्त इतर ठिकाणी किंवा विजिटिंग पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करणे
  • रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावणे, पार्टी करणे किंवा शेजाऱ्यांना त्रास देणे
  • लिफ्ट, कॉरिडॉर, क्लबहाऊस किंवा गार्डन यांसारख्या सार्वजनिक जागांचे नुकसान करणे
  • ओला आणि सुका कचरा वेगळा न करणे किंवा उघड्यावर कचरा फेकणे
  • हाऊसिंग सोसायट्यांचे सुरक्षा नियम, उपविधी किंवा कायदे व नियमावलींकडे दुर्लक्ष करणे.

अशा परिस्थितीत, भविष्यातील कोणतेही संभाव्य वाद टाळण्यासाठी फ्लॅट भाड्याने देण्याआधी घरमालक आणि भाडेकरू या दोघांनी सोसायटीच्या नियमांवर चर्चा करावी. Rent Agreement तयार करताना सोसायटीचे मेंटेनन्स, सुरक्षा नियम आणि दंडाची जबाबदारी यासंबंधीचे सर्व मुद्दे स्पष्ट नमूद केले पाहिजे.