Today’s Gold-Silver Rate 18 August 2026: भारतीय सराफा बाजारात 18 ऑगस्टच्या सकाळी सोने आणि चांदीच्या दरात नफावसुली होताना दिसत आहे. क्रूडच्या किमती आणि डॉलरमुळे गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये तेजीचा कल सुरूच असून आता सणासुदीचे दिवस तसेच, पश्चिम आशियातील घडामोडींची गुंतवणूकदार आणि खरेदीदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

श्रावण महिना सुरू होताच सणासुदीचे दिवस सुरू होता आणि त्यासोबतच सराफा बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली आहे, पण यावेळी वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचा हात आखडता आहे. देशांतर्गत सराफा तसेच MCX (फ्युचर्स मार्केट) वर सोन्या-चांदीच्या किमतींनी अलीकडच्या दिवसांत दरवाढीचा आलेख उंचावत ठेवला असताना आगामी सणासुदीच्या दिवसांत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सोने-चांदीचा आजचा दर
मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात MCX वर सोने-चांदीच्या दरात घट नोंदवली गेली आहे. बाजारातील सहभागींचे लक्ष आता फेडच्या व्याजदर Outlook आणि सोन्याच्या पुढील हालचालीबद्दल अधिक संकेत मिळवण्यासाठी या आठवड्यातील FOMC बैठकीच्या मिनिट्सवर केंद्रित असेल. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत 56.76% आणि चांदीच्या दरात 109.54% इतकी मोठी वाढ झाल्यामुळे मौल्यवान धातूंचे दर गुंतवणूकदार आणि ग्राहक या दोघांच्याही विशेष लक्षवेधी ठरले.
Gratuity Calculator: 5 वर्ष काम केल्यानंतर 20000 च्या बेसिक सॅलरीवर किती ग्रॅच्युइटी मिळेल? एक छोटा फॉर्म्युला सांगेल सगळा हिशोबमल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मंगळवारी सकाळी सोन्याचा वायदा 0.51 टक्के किंचित घसरणीसह 1.55 लाखांच्या आसपास व्यवहार करत आहे, तर चांदीचे फ्युचर्स 0.94% कमी होऊन 2.35 लाख रुपये किलोवर घसरले आहेत. तसेच देशातील सराफा बाजारांमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,55,670 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोने 1,42,710 रुपये 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,16,770 रुपये 10 ग्रॅम इतका आहे.
सरकार E20 पेट्रोलवर आग्रही असताना मुख्य आर्थिक सल्लागारांनीच दर्शवला विरोध, कारणंही दिली; अन्नसंकटाचा इशारागेल्या आठवड्यात अमेरिकेतील कमजोर आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हकडून अधिक कठोर चलनविषयक गुंतवणूकदारांच्या धोरणाच्या अपेक्षांना धक्का बसला. अपेक्षेपेक्षा कमजोर चलनवाढ, रोजगार आणि किरकोळ विक्रीच्या आकडेवारीमुळे सोन्याला फायदा झाला, ज्यामुळे डॉलरवर दबाव आला. मात्र, नवीन आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम आशियातील अमेरिका आणि इराण यांच्यातील परिस्थितीमुळे सोने-चांदीतील गुंतवणुकीवर दबाव आणला.

