Headlines

डोंबिवलीत भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं हिंदीत भाषण, राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख, बृजभूषण सिंह यांचा उल्लेख करत मनसेला डिवचलं


भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी डोंबिवली येथे हिंदी भाषिक नागरिकांच्या कार्यक्रमात उपस्थितांना खूश करण्यासाठी हिंदीत भाषण केले. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत खोचक शब्दांत टीका देखील केली.

The first Hanuman Chalisa of MNS will be recited on April 16 in Pune in the presence of Raj Thackeray
राज ठाकरेंच्या उपस्थित पुण्यात मनसेचे पहिले हनुमान चालिसा पठण; हिंदूजननायक असा राज यांचा उल्लेख
डोंबिवली (ठाणे) : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महत्त्वाचे नेते आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार निवडून आले नसले तरी त्यांच्या भूमिकेला राजकारणात महत्त्व आहे. राज ठाकरे यांनी विविध निवडणुकांमध्ये आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता ते भाजपच्या विरोधात रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल किंवा इतर मुद्दे असतील, राज ठाकरे यांच्याकडून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. राज ठाकरे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेनंतर आता भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी एका उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उपस्थितांना खूश करण्यासाठी राज ठाकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. एका कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मराठमोळ्या कल्याण डोंबिवलीत हिंदी भाषण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यासोबत मनसे नेत्यांना डिवचणारं वक्तव्य नंदू परब यांनी केलं आहे.

मनसेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी वारंवार मागणी करत विषय लावून धरला होता. यातच मराठी भाषेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र मराठमोळ्या कल्याण डोंबिवलीत एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मराठमोळ्या कल्याण डोंबिवलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी चक्क हिंदीत भाषण केले आणि यावेळी हिंदीत भाषण करत उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा उल्लेख करत, त्यांच्या भूमिकेला समर्थन दर्शविणारे वक्तव्यही त्यांनी केले.

नंदू परब राज ठाकरेंना उद्देशून काय म्हणाले?

नंदू परब यांनी हिंदीमध्ये आपल्या भाषणात सांगितले की, “ब्रिजभूषण सिंह यांना मी सलाम ठोकतो. त्यांनी एकच धक्का दिला. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखव. राज ठाकरे गेले नाहीत. उत्तर भारतीय माणसाने दाखवून दिलं”, असे नंदू परब म्हणाले.

शिंदेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार?

दरम्यान, नंदू परब यांचा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओवर भाजपसोबत युतीमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते? ते पाहणे महत्त्वाचे आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीवेळी मनसेने खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांना पाठींबा दिला होता. शिवसेना मराठी माणसांच्या हक्कासाठी तयार झाली हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्याची आठवण शिवसेना भाजपला करून देणार का? आणि राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे भाजप जिल्हााध्यक्ष नंदू परब यांना उत्तर देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा