Higher Pension म्हणजे नेमकं काय?
सध्या देशभरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून पेन्शनवाढीची मागणी होत आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. Higher Pension हा एक पर्याय आहे ज्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दरमाह मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेत वाढ होईल. परंतु, प्रत्येक कर्मचाऱ्याला या पर्यायाचा लाभ घेता येईलच असे नाही. त्यासाठी काही अटी-शर्ती आहेत, ज्यांना पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच Higher Pension चा लाभ घेता येईल.
सध्या Higher Pension मिळवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी लाखोंच्या संख्येत अर्ज केले आहे. ईपीएफओकडून या अर्जांची दखल घेतली जात आहे. पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना Higher Pension चा लाभ घेता येणार आहे, तसेच त्यांना Arrears ही पुरवण्यात येईल.
Arrears म्हणजे नेमकं काय?
जर एखादा कर्मचारी Higher Pension साठी पात्र ठरत असेल तर त्याच्या पेन्शनमध्ये वाढवण्यात आलेली रक्कम गेल्या लागू महिन्यांच्या पेन्शन रक्कमेतही जोडली जाईल. समजा, एखाद्या कर्मचाऱ्याची आधीची पेन्शन रक्कम दरमाह 5,000 रुपये आहे. तर Higher Pension लागू झाल्यानंतर वाढलेली पेन्शन रक्कम दरमाह 8,000 रुपये आहे. जुलै 2026 महिन्यात रक्कम वाढवण्यात आली आहे परंतु Higher Pension साठी लागू महिना जानेवारी 2026 आहे. तर पेन्शनच्या रक्कमेत वाढवण्यात आलेले 3,000 रुपये जानेवारी 2026 ते जून 2026 महिन्यांच्या पेन्शन रक्कमेतही जोडण्यात येईल आणि या 6 महिन्यांच्या थकबाकीला Arrears असे म्हणतात.
लोकसभेत चर्चा सुरू!
भारत सरकार सध्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत चर्चा करत आहे. परंतु, पात्र कर्मचाऱ्यांना Higher Pension लागू होण्याची तारीख आणि त्यांच्या खात्यात Arrears जमा होण्याची तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आली नाहीये. आतापर्यंत एकूण 15,24,365 कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून अद्याप 11,595 Claim Pending आहेत. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात निर्णय घेताना कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ आणि आर्थिक समतोल या दोन्ही गोष्टींचा विचार केला जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.
अर्जाची दखल घेताना ईपीएफओकडून कर्मचाऱ्याचे अंतिम वाढीव वेतन, पीएफ योगदान तसेच कंपनीकडून कर्मचाऱ्यासाठी करण्यात येणारे पीएफ योगदान अशा अनेक महत्वाच्या गोष्टींची पडताळणी करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ योगदान कमी असेल त्यांना आधीचा फरक आधी भरून काढावा लागू शकतो, त्यानंतर पात्र असल्यास ईपीएफओकडून कर्मचाऱ्याचे Higher Pension अर्ज मंजूर करण्यात येईल.
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे पीएफ योगदान 1 लाख रुपये आहे परंतु जर हायर पेन्शनसाठी कर्मचाऱ्याचे किमान पीएफ योगदान 2 लाख रुपये असेल तर कर्मचाऱ्याला अतिरिक्त 1 लाख रुपयांची भरपाई करून पात्र होण्यासाठी लागणाऱ्या रक्कमेतील फरक भरून काढावा लागू शकतो, तरच कर्मचारी Higher Pension साठी पात्र ठरतो.

