राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आपल्याला आमदारकीची पर्वा नाही. पण हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : आमदारकी गेली तरी चालेल; पण शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून हा रेल्वेमार्ग होऊ देणार नाही असा थेट आणि आक्रमक इशारा विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिल्याने राहुरी–शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध करत शेकडो शेतकरी रविवारी नगर–मनमाड राज्य महामार्गावर उतरले.
राहुरीच्या जिजाऊ चौकात झालेल्या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्ग तब्बल तासभर ठप्प झाला आणि तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. प्रस्तावित राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्ग तांदुळवाडी, देसवंडी, तमनर आखाडा, कोंढवड, उंबरे, ब्राम्हणी तसेच नेवासा तालुक्यातील सोनई, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी आणि कांगोणी परिसरातून जाणार असल्याचे सांगितले जाते. या मार्गासाठी शेतजमिनींचे भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने संबंधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
तनपुरे यांनी सरकारच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला
याच पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तनपुरे यांनी सरकारच्या भूमिकेवर थेट निशाणा साधत रेल्वेमार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची धार कमी करू नका. या लढ्यात माझी आमदारकी गेली तरी चालेल. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी मी मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली.
सत्ताधारी आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर
प्राजक्त तनपुरे हे भाजपचे आमदार असल्याने त्यांच्या आक्रमक भूमिकेने या आंदोलनाला राजकीय रंगही चढला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात रस्त्यावर उतरत तनपुरे यांनी थेट संघर्षाची भूमिका घेतल्याने महायुती सरकारपुढेही हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
शिवसेनेचे नेते रावसाहेब खेवरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी सेनेचे रविंद्र मोरे यांनीही रेल्वेमार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. सरकार जबरदस्तीने भूसंपादन करत असेल तर तीव्र संघर्ष उभारला जाईल. आमच्या खासगी जमिनींमधून कोणत्याही परिस्थितीत रेल्वेमार्ग होऊ देणार नाही,असा इशारा मोरे यांनी दिला.
महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी
चक्काजाम आंदोलनामुळे नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. अनेक वाहने पर्यायी मार्गाने शहरात वळवण्यात आल्याने राहुरीच्या बाजारपेठेतही मोठी गर्दी झाली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भूसंपादनाला विरोध केला.
आंदोलनकर्त्यांच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन थांबवून प्रस्तावित रेल्वेमार्गाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली.आंदोलनात राजुभाऊ शेटे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, प्रदीप भुजाडी, रविंद्र आहेर, राजेंद्र उंडे, प्रतिक तनपुरे, सुरेश बानकर, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खुळे, रविंद्र आढाव, ज्ञानेश्वर बाचकर, सुरेश लांबे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
रेल्वेमार्गाचा मुद्दा आता निर्णायक वळणावर
राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा विरोध यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे रेल्वे प्रकल्प पुढे नेण्याची सरकारी भूमिका, तर दुसरीकडे जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा ठाम विरोध अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा