Bhandara Gondiya Vidhan Parishad Election BJP fields Avinash Brahmankar rebel independent candidate Sachin Kumbhalkar in fray; भाजप अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विधान परिषद निवडणूक रिंगणात, तरी बंडखोर अपक्षाचा अर्ज कायम, भंडाऱ्यात भाजपच्या Plan B ची चर्चा
Bhandara Gondiya Vidhan Parishad Election BJP fields Avinash Brahmankar rebel independent candidate Sachin Kumbhalkar in fray; भाजप अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर विधान परिषद निवडणूक रिंगणात, तरी बंडखोर अपक्षाचा अर्ज कायम, भंडाऱ्यात भाजपच्या Plan B ची चर्चा
Maharashtra Vidhan Parishad Election : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना संधी दिली आहे, तर भाजपचे शहराध्यक्ष तथा भंडारा नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सचिन कुंभलकर हे रिंगणात अपक्ष म्हणून कायम आहेत
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससमर्थित आणि अपक्ष अशा तीन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. वरवर पाहता ही निवडणूक भाजपसाठी सुकर ठरणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र भाजपचाच एक उमेदवार अपक्ष लढत देत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत. भाजपचा अधिकृत उमेदवार रिंगणात असताना त्याच पक्षाचा दुसरा उमेदवार निवडणुकीत कशापायी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजप शहराध्यक्षच अपक्ष रिंगणात
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने अविनाश ब्राह्मणकर यांना संधी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शिवसेना (उबाठा) या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेसने अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा देत त्यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. याशिवाय तिसरे उमेदवार सचिन कुंभलकर हे अपक्ष आहेत. कुंभलकर हे भाजपचे शहराध्यक्ष तथा भंडारा नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य आहेत. ४ जून रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत होती. नामांकन दाखल करणाऱ्या अनेकांनी त्यादिवशी अर्ज मागे घेतले. परंतु, कुंभलकर हे निवडणुकीत कायम राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. Navneet Rana : पार्थ-सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं, पण मी अट नाकारली, नवनीत राणांचा खुलासा
भाजपचा ‘प्लान बी’ चर्चेचा विषय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभलकर यांना निवडणुकीत अपक्ष म्हणून ठाम राहण्यासाठी पक्षाकडूनच सांगण्यात आले होते. त्यामुळेच त्यांनी अर्ज मागे घेतले नाही. परंतु, पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना भाजपने आखलेला हा ‘प्लान बी’ चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
Uday Samant On Bacchu Kadu | CM Fadnavis यांच्यावर बच्चू कडूंच वक्तव्य,मंत्री सामंत थेटच बोलले
भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही भूषविले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. आता पक्षाने त्यांना पुन्हा विधान परिषदेत संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील मूळ कार्यकर्ते नाराज झाल्याचीही चर्चा आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा