Mohammad Kaif on Rishabh Pant : भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यानध्ये भारताने चांगली पकड मिळवली आहे. पहिल्या डावात भारताने ४६२ धावा केल्या आहेत. मात्र भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफवर चांगलाच भडकल्याचं दिसून आलं? नेमकं काय कारण जाणून घ्या.

मोहम्मद कैफ काय म्हणाला?
ऋषभ पंत याने ३९ धावा केल्या होत्या, यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला होता. पंत त्याच्या आक्रमकशैलीत खेळत असतो, त्यामुळे त्याची विकेट जाण्याची दाट शक्यता असते. रविवारीसुद्धा असेच काहीसे झाले. पंत अशाच पद्धताने गोलंदाजाला पुढे येऊन मारण्याच्या नादात आऊट झाला. मोहम्मद कैफ म्हणाला की, तो आऊट झाला याचं काही नाही पण तो ज्यावेळी आऊट झाला तो वेळ चुकीचा होता, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, विरोधी संघाने नवीन चेंडू घेतल्यावर त्याचा अंदाज घ्यायला हवा पण पंतने असे न करता नवीन चेंडूवर पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन ते तीन चेंडूवर तो अपयशी ठरला पण तो पुन्हा पुढे आला आणि आपली विकेट गमावून बसला, असं मोहम्मद कैफ म्हणाला.
Kambli Web Series : सचिनचा जीवलग ते मैत्रीतील दुरावा; ‘कांबळी’चं वादळी आयुष्य आता OTTवर, भूमिकांबाबत उत्सुकता, कुठे पाहता येणार?
भारतास जागतिक कसोटी विजेतेपदाच्या स्पर्धेतील आपले आव्हान राखण्यासाठी या मालिकेत धवल यश आवश्यक आहे. पावसाचा वाढता व्यत्यय लक्षात घेऊन भारतीयांनी धावांचा वेग वाढवण्याकडे जास्त लक्ष दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ पाऊस, ओलसर मैदान तसेच अपुऱ्या प्रकाशामुळे दुपारी २.३५ वाजता सुरू झाला आणि त्याचा फायदा यजमानांना सुरुवातीस झाला. भारतीयांना दिवसभरात १७२ धावा करण्यासाठी सात विकेटचा मोबदला द्यावा लागला.
KL Rahul : नर्व्हस नाईन्टीज नाही, राहुलचं ‘नर्व्हस एटीज’! 82वर पुन्हा शतक हुकलं, सातव्यांदा 80-90च्या आसपास अडकला
पहिल्या दिवसाच्या २ बाद २८८वरून सुरुवात करताना धावगती उंचावण्यास भारताची जास्त पसंती होती. ऋषभ पंतने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मात्र खेळपट्टीने फिरकी गोलंदाजांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पंतची फटकेबाजी फारवेळ सुरू राहिली नाही. दुसऱ्या नव्या चेंडूवर श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज जास्तच भेदक भासू लागले. अचुक टप्प्यावर मारा करणाऱ्या नूवांथाच्या फिरकीने पहिल्या दिवशी निवृत्त झालेल्या राहुललाही चकवले. नूवांथाने या दोन विकेट १२ धावांतच घेतल्या होत्या. देवदत्त पडिक्कल या पडझडीत शांत राहिला. त्याने क्रीझचा हुशारीने वापर करीत दीडशतक पूर्ण केले. त्याचे पूर्ण वर्चस्व दिसत असतानाच जयसूर्याने त्याला चकवले.
WTC Point Table 2026 : बांगलादेशविरूद्ध ऑस्ट्रेलियाचा पराभव भारतासाठी फायद्याचा की तोट्याचा, पुढची समीकरणे समजून घ्याचहापानानंतर रवींद्र जाडेजाही पायचीत झाला आणि भारताची अवस्था ६ बाद ३७७ अशी झाली. भारतास चारशेच्या आत रोखण्याचे स्वप्न श्रीलंका बघू लागली. मात्र चिवट ध्रुव जुरेल आणि मानव सुतारने अर्धशतकी भागीदारी केली. जुरेलला २९ धावांवर असताना जीवदान लाभले होते. जुरेलने पूर्ण वर्चस्व राखले नाही. मात्र आक्रमणाची एकही संधी सोडली नाही. अर्धशतक झाल्यावर जुरेल चांगल्याच वळलेल्या चेंडूवर परतला. भारतीय फलंदाज त्यानंतर जास्त आक्रमक झाले. मोहम्मद सिराज आणि मानव सुतारने काही चेंडूंच्या अंतराने षटकार मारला.
Rohit Sharma Fan : सायकलवरुन १८०० किमी प्रवास; निर्जन जंगलं पार केली, मदतीचे पैसे नाकारले; रोहितच्या फॅननं मुंबई गाठलीच, पुढं काय घडलं?श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज प्रभावी मारा करीत असताना त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी निराशा केली. तेच भारताच्या पथ्यावर पडले. दुसऱ्या दिवसअखेर मानव सुतारने संघाची तळाच्या फलंदाजाने उपयुक्त खेळी करण्याची गरज पूर्ण केली होती. आज, सोमवारी तिसऱ्या दिवशी सुतार, जाडेजा आणि कुलदीप यादव फिरकी गोलंदाजांना मदत करू लागलेल्या खेळपट्टीवर काय करामत करणार याकडे लक्ष असेल.

