Headlines

Mukesh Khanna on National Anthem: ‘जन गण मन’ हटवून ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत करा, अभिनेते मुकेश खन्ना यांची मागणी, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता


मुंबई: नुकताच आपण आपला ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ‘वंदे मातरम’ आणि यासंदर्भातला वादही पाहायला मिळाला. आता ‘शक्तिमान’ फेम ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी राष्ट्रगीताबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे देशाचे मूळ राष्ट्रगीत नसून, ते हटवून त्याऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला पाहिजे, अशी मागणी खन्ना यांनी केली आहे.

‘जन गण मन’ ब्रिटीश राणीच्या स्तुतीसाठी?

एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुकेश खन्ना यांनी दावा केला की, मी तीन वर्षांपूर्वीच ही मागणी केली होती. ‘जन गण मन’ हे आपल्या देशाचं राष्ट्रगीत नाहीच. रवींद्रनाथ टागोर यांनी ते ब्रिटनच्या राणीच्या सन्मानार्थ (स्तुतीसाठी) लिहिलं होतं आणि आपण ते स्वीकारलं. त्यामुळं ‘जन गण मन’ शक्य तितक्या लवकर हटवून त्याऐवजी ‘वंदे मातरम्’ आणलं पाहिजे.

‘वंदे मातरम्’ हेच खऱ्या अर्थानं आपल्या मातीचे आणि राष्ट्रभावनेचं प्रतीक आहे. दिवंगत भारतरत्न लता मंगेशकरयांनी हे गीत अत्यंत सुंदर पद्धतीनं गायलं आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.

Maharashtra TimesI Am Sorry, तुला थँक्यू म्हणता आलं नाही! आयुष्य आता आधीसारखं नाही, ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी लेक तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट
स्वतः रेकॉर्ड केले ७ मिनिटांचे ‘वंदे मातरम’

आपल्या ‘वंदे मातरम्’ संदर्भातल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना खन्ना म्हणाले की, त्यांनी प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्या सहकार्यानं स्वतः ७ मिनिटांचं एक विशेष ‘वंदे मातरम्’ गीत रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं अत्यंत प्रभावी आणि आयकॉनिक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून आगामी काळात ते हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत.

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य देत असल्याचं पाहून आपल्याला आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केलं.

Maharashtra TimesSaif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामवर आरोप निश्चित, लवकरच सुरू होणार खटला
इतिहास काय सांगतो?

मुकेश खन्ना यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संविधान सभेनं २४ जानेवारी १९५० रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘जन गण मन’ला भारताचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली होती, तर बंकिमचंद्र चॅटर्जी चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ला राष्ट्रीय गाणे म्हणून समान सन्मान दिला होता.