Headlines

Sohail Khan : ‘अलायन्स’ मध्ये जाताच सोहेल खान पडलेला आजारी, झालेला पोटाचा आजार; अभिनेत्यानं सांगितलं वजन कमी होण्याचं कारण


Sohail Khan On Weight Loss : सोहेल खाननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वजन कमी होण्याचं कारण सांगितलं आहे.

Sohail Khan On Weight Loss
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेता-निर्माता सोहेल खानचा लूक अचानक बदललेला दिसत असून अभिनेत्याचं वजन कमी झालेलं दिसत आहे,. ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोच्या रॅप-अप पार्टीमध्ये सोहेलची शरीरयष्टी बदललेली दिसत होती त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, सोहेलनं त्याच्या बदलामागील सत्य सांगितलं आहे. शोच्या सुरुवातीलाच आजारी पडूनही, हा अभिनेता पाच आठवडे शोमध्ये होता.

सोहेलनं सांगितलं वजन कमी होण्याचं कारण

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोहेल म्हणाला, ‘पहिल्या काही दिवसांत मला थोडं अस्वस्थ आणि घुसमटल्यासारखं वाटलं, कारण रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पहिल्या आठवड्यातच मला पोटाचा आजार झाल्यानं गोष्टी आणखी कठीण झाल्या. पहिल्या आठवड्यात पोटाच्या आजारामुळे माझ्या त्रासात आणखी भर पडली. स्पर्धकांनी माझी खूप काळजी घेतली. म्हणूनच, पहिल्या आठवड्यापासून आजारी असूनही, मी तिथे पाच आठवडे राहिलो.’आजारी असल्यामुळे सोहेलला आपल्या आहाराबाबत अधिक काळजी घ्यावी लागली. अभिनेत्यानं सांगितलं की, त्याला रिॲलिटी शोमधील प्रवासात आरोग्य सांभाळून टास्कमध्ये सहभागी व्हायचं होतं. त्यामुळे स्पर्धेसाठी त्याला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागलं. तिथं भेटलेल्या नवीन कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत त्याला शेवटच्या दिवसापर्यंत राहायचं होतं आणि ही नाती आयुष्यभर टिकतील अशी आशा त्यानं व्यक्त केली.

Maharashtra TimesAnkur Wadhave : एकाकीपणा अन् मनात नको ते विचार, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्यानं केलेला डिप्रेशनचा सामना; सांगितला कठीण काळ
सोहेलनं वजन कमी करण्यासाठी काही औषधं घेतली असतील, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलेलं. याबद्दल बोलताना सोहेल म्हणाला की, ‘मी ओझेम्पिक घेत नाही, फॅट बर्नर घेत नाही, मी फक्त शुद्ध जेवण जेवतो.’

Maharashtra TimesSwati Deval : तीन वेळा गर्भपात, वैयक्तिक आयुष्यात त्रास, तरीही नाही मानली हार; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ
‘द अलायन्स’ या कार्यक्रमादरम्यान सोहेलच्या वजनावर चर्चा झाली होती. सलमानने खुलासा केला की, सोहेलनं आधीच १२ किलो वजन कमी केलं होतं. अलीकडेच ‘द अलायन्स’ पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनेत्याबद्दल काळजी व्यक्त केलेली.

Maharashtra TimesKhushbu Sundar : वयाच्या 8व्या वर्षी वडिलांकडून अत्याचार, आईचाही केलेला छळ; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलेली आपबिती
दरम्यान, चित्रपटांपासून दूर, सोहेल खान ‘अलायन्स’ या कार्यक्रमामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह देखील या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमामध्ये सोहेल आणि सीमाची मैत्री दिसून आली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा