Headlines

Nakul Ghanekar On Father Support For Acting ; Nakul Ghanekar On Father : एअर इंडियाची नोकरी सुरू असतानाच नकुल घाणेकरला मालिकेसाठी कॉल, वडील ICU मध्ये; अभिनयासाठीचा विरोध अचानक पाठिंब्यात


ठरलं तर मग या मालिकेमध्ये सचिन हे पात्र साकारणारा अभिनेता नकुल घाणेकर याने यापूर्वीही अनेक वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतून तो पहिल्यांदाच निगेटिव्ह रोल साकारत आहे. सचिनने नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नर मध्ये मुलाखत दिले यामध्ये त्यांनी त्याच्या आयुष्यातल्या अनेक रंजक घटना, काही हळव्या आठवणी शेअर केल्या. सचिन हा अभिनेता होण्यापूर्वी एअर इंडिया मध्ये फ्लाईट अटेंडंट होता. नोकरी सोडण्यासाठी त्याने वडिलांची परवानगी मागितलेली पण त्यांनी ती नाकारलेली.

ही आठवण सांगताना नकुल घाणेकर म्हणाला की, मी बीएस सी आणि एम एसी केलं आहे त्यामुळे मला बाबा म्हणायचे की तू एवढा शिकला आहेस तर तू काहीतरी नोकरी केली पाहिजे, तुझ्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च केलाय तर तू चूपचाप घरी पैसे आण. तेव्हा मी त्यांचे बोलणं मान्य केलं. तेव्हा मी नोकरी करता करता 8/9 वर्ष माझ्या डान्स क्लासचीही सुरुवात केली होती. दोन्ही मी सोबत करत होतो. डान्स क्लासपण मी हळूहळू वाढवत होतो. नोकरीतून मिळालेले पैसे मी अर्धे घरी द्यायचो आणि उरलेले डान्स क्लाससाठी किंवा त्याच्या पब्लिसिटीसाठी वगैरे वापरायचो. पुढे एका पॉइंटला मला अनोळखी नावाची मालिका मिळाली, मी मराठी नावाच्या चॅनलवर मला ती मालिका मिळालेली. ती सीरियल करता करता मी नोकरी केली. नोकरीतून लीव्ह विथआऊट पे वगैरे घेऊन मी काम करायचो.

Maharashtra TimesAamir Khan Crying : हॉस्पिटलमधून रडतच बाहेर पडला आमिर खान अन् त्याचा मुलगा, सोबत असणारी Ex पत्नीही दिसली अस्वस्थ, Video Viral
त्या मालिकेनंतर मी बाबांना विचारलेलं की मला नोकरी करुन कंटाळा आला आहे. मी अजून काही तरी वेगळं करतो ना, मी ऑडिशन देतो, डान्स क्लासचं बघतो ना. त्यावर ते म्हणालेले की नाही अजून… तू नोकरी सोडावीशी मला वाटत नाही. तू स्वत:च्या पायावर उभं राहायला हवं. आता मागे वळून पाहताना असं वाटतं की बरं झालं ते असं तेव्हा म्हणालेले, त्यामुळे मी अजून नेटाने पेटून काम करु लागलो. जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा ऑडिशन द्यायचो, डान्स क्लास बघायचो. दिग्दर्शकांना वेगैरे भेटायचो. त्यानंतर मला झी मराठी वरची अजूनही चांद रात आहे ही मालिका मिळाली.

नकुल घाणेकरची संपूर्ण मुलाखत

माझे बाबा आयसीयू मध्ये होते तेव्हा मी परत त्यांना विचारलं, की बाबा नोकरी सोडू का? झी मराठीवर लीड रोल साठी सीरियल मिळाली आहे. डान्स क्लासही उत्तम सुरू आहे. नृत्यालंकार झालो आहे मी आता. कथ्थकमध्ये मी पोस्ट ग्रज्युएशन केलं. तर आता तरी नोकरी सोडू शकतो का? तेव्हा बाबा मला म्हणाले की सोड…. त्यांचा तो शब्द ऐकून मला ग्रीन सिग्नल मिळाला. मला खूप हुश्श वाटलं कारण घरातली एक व्यक्ती जेव्हा तुम्हाला पाठिंबा देते तेव्हा ती ताकदच वेगळी असते. बाबांनी मला त्या मालिकेत काम करताना पाहिलं. त्या मालिकेसाठी मला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा झी मराठी पुरस्कारसुद्धा मिळाला.त्यानंतर 6 महिन्यांतच बाबा गेले. त्यापूर्वी 4/5 वर्ष त्यांची तब्येत खालावली होती. ते वैज्ञानिक होते. त्यामुळे त्यांच्याकडे परस्थिती कडे पाहण्याचा दूर दृष्टीकोन होता.

Maharashtra TimesPooja Bedi On Aditya Pancholi Affair : पूजा बेदीशी भांडण झाल्यावर आदित्य पांचोलीचे मोलकरणीला आमिष दाखवत प्रेमाचे चाळे, लव्हबाइटमुळे प्रकरण समोर, पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाला यूटर्न
आणि बरं झालं त्यांनी त्यावेळी मला नोकरी करायला लावली. त्याचा मला खूप फायदा झाला. माझ्या नोकरी मुळे मला सतत परदेशात प्रवास करावा लागत होता. त्याचा मला माझ्या सालसा नृत्य शैलीला खूप फायदा झाला. मला वेगवेगळ्या देशात काही सालसा ट्रेनर्स मिळाले, मग मी त्यांच्याकडे जाऊन शिकायचो. माझे मित्र वगैरे क्लब पबला जायचे मी मात्र डान्स शिकायला जायचो. त्या जॉबमुळे मला स्वत:ची जागा खरेदी करता आली. जिथे माझा डान्स क्लास आहे.

नकुल घाणेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अजूनही चांद रात आहे, गाथा नवनाथांची अशा मालिकांमध्ये काम केले आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत