Headlines

Sankarshan Karhade : जपान मधल्या भारतीयांच्या कृतीनं भारावला संकर्षण कऱ्हाडे, स्वातंत्र्यदिनी अभिनेत्यानं शेअर केला खास अनुभव


Sankarshan Karhade Post : संकर्षण कऱ्हाडेनं स्वातंत्र्यदिनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत एक अनुभव शेअर केला आहे.

Sankarshan Karhade Post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनेता सोशल मीडिया मार्फत त्याच्याविषयीचे अपडेट्स शेअर करतो. अशातच आता संकर्षणनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर एक अनुभव शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, ‘नमस्कार, संकर्षण कऱ्हाडे, भारतमाता की जय! वंदे मातरम. आपल्या सगळ्या भारतवासीयांना, संपूर्ण हिंदुस्तानाला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मी तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करणार आहे, तो तुम्हाला आवडतोय का बघा. आम्ही नाटकाच्या प्रयोगासाठी टोकियो, जपानला गेलो होतो. आपले भारतीय, आपली संस्कृती राखत ती जपत इतरांची संस्कृतीही आपलीशी करतात, याचा एक उत्तम अनुभव आला.’

Maharashtra TimesMini Mathur : ‘माझ्या सासरचे लोक धार्मिक नव्हते’, मुस्लीम दिग्दर्शकासोबत लग्न, आंतरधर्मीय विवाहाबद्दल स्पष्टच बोलली लोकप्रिय अभिनेत्री
अनुभव सांगताना संकर्षण पुढे म्हणाला की, ‘आम्ही जपानला गेलो, तिथे निरंजन जोशी म्हणून आयोजक होते. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला हात जोडून, ‘नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, खूप मनापासून स्वागत आहे’, असं म्हणत स्वागत केलं! आमचे नाटकाचे प्रयोग झाले. आम्ही परत निघालो. निघताना ते असं म्हणाले की, तुम्ही इथून जाताना तुम्हाला जपानी पद्धतीनं कमरेतून वाकून नमस्कार करणार आहे. आम्ही म्हणालो, असं का? त्यावर ते म्हणाले की, आपण भारतीय आपली संस्कृती तर जपून ठेवतोच, पण आम्ही गेली १५-२० वर्षं जपानमध्ये आहोत. तर, तिथली संस्कृती स्वीकारणं, हेसुद्धा चांगलं माणूस असल्याचं लक्षण आहे.’

‘मला हा अनुभव इतका आवडतो, इतका आठवतो आणि इतका शिकवतो की, भारतीय मूळ कसं आहे की, आपलं तर राखायचंच, त्याचा मान कुठेही कमी होऊ द्यायचा नाही. पण, इतरांचं जे चांगलं आहे, तेही स्वीकारायचं आणि ते घेऊन पुढे जायचं. तर हा अनुभव आपल्याला भारतीय म्हणून समृद्ध करतो. असेच छान भारतीय व्हा, आनंदी राहा. आपलंही राखा आणि इतरांनाही स्वीकारा आणि मोठे व्हा. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारतमाता की जय! स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.’ असं संकर्षणनं पुढे म्हटलं आहे.

Maharashtra TimesVishal Aditya Singh : 7 वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्यानं सोडलं मौन; काय म्हणाला?
हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्यानं, ‘स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा, हा अनुभव ऐका, आवडला तर नक्की सांगा’ असं कॅप्शन लिहिलं आहे.