Reddit Viral Story Post: कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे धडे कोणत्या प्रतिष्ठित महाविद्यालय किंवा पुस्तकातून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचे निरीक्षण करून मिळतं. एका 34 वर्षीय MBA पदवीधरासोबत नेमके हेच घडलं. MBA पदवीधर तरुण जवळच्या परिसरातील पान विक्रेत्याचे 1 कोटींचे घर, दुकान आणि गाडी पाहून करिअरच्या पारंपरिक मार्गांचा नव्याने विचार करणे भाग पडले.

छोटे उद्योग-व्यवसाय अनेकदा दिसायाला साधारण वाटतात पण, त्यातून बरेच लोक भरपूर पैसे कमावतात.एका रेडिट वापरकर्त्याने अशाच एका पान विक्रेत्याची कहाणी शेअर केली. अलीकडच्या परिसरातील एका पानाच्या दुकानाला दिलेल्या भेटीने एका 34 वर्षीय एमबीए पदवीधराचे लक्ष वेधून घेतले. या पान विक्रेत्याकडे जवळपास 1 कोटींचे दुकान आणि कार आहे, जे पाहून एका MBA पदवीधरही आश्चर्यचकित झाला.
पान विक्रेत्याची कोट्यवधींची संपत्ती
रेडिट वापरकर्त्याने सांगितले की, त्या दुकानदाराने अंदाजे 1 कोटींची एक कार आणि एक दुकान खरेदी केले. यामुळे त्या MBA पदवीधराने आपल्या आजूबाजूला व्यवसाय करणाऱ्या लोकांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये पान विक्रेते, किऑस्क मालक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि स्थानिक ज्यूस विक्रेत्यांचा समावेश होता.
Millionaire Post: अमेरिकेत 100 कोटी रुपये कमवणारा भारतातल्या एका छोट्याशा गावात का राहतोय? उद्योगपतीची मनाला भावणारी पोस्टआजच्या काळात MBA सारखी पदवी घेऊनही नोकरीसाठी अनेक मुलाखती द्याव्या लागतात आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा नोकरी बदलून अधिक पैसे कमावणे दिवसेंदिवस कठीण होत आहे, तरी ज्यांना आपण छोट्या पानवाल्याचे दुकान चालवणारे किंवा छोटी-मोठी कामे करणारे समजतो, त्यापैकी बरेच जण चांगली कमाई करत आहेत.
यापैकी कोण प्लंबर आहे, तर कोण इलेक्ट्रिशियन आहे, तर कोण छोटंस दुकान चालवतात, तर काही मोबाईल फोन विकून चांगले पैसे कमावत आहेत, संपत्ती निर्माण करत आहेत आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना रोजगारही देत आहेत.
नोकरी सोडल्यावर दुसरं काम मिळणं मुश्किल
नोकरीच्या शोधात असलेल्या या तरुणाने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली, तेव्हा इंटरनेटवर ‘पदवी अधिक महत्त्वाची की कौशल्य?’ यावर चर्चा सुरू झाली. 34 वर्षीय तरुणाची ही तुलना वैयक्तिक होती. टियर-3 कॉलेजमधून MBA पदवी मिळवूनही पाठदुखीमुळे नोकरी सोडल्यानंतर सध्या योग्य नोकरी शोधण्यासाठी धडपडत आहे. उच्च शिक्षणामुळे नेहमीच चांगल्या आर्थिक संधी मिळतात का? याबाबत आता त्याला अनुभवाने आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.
रेडिटच्या r/ThirtiesIndia वर आपला अनुभव सांगताना त्या युझरने लिहिले, “मी अलीकडेच सिगारेट ओढायला जवळच्या एका पानाच्या दुकानात गेलो होतो. मला कळलं की दुकानदाराने तब्बल 1 कोटी रुपयांची कार आणि दुकान विकत घेतले आहे, त्याच्या घराचे रिनोव्हेशनही करत आहे. मला समजतं की हे खूप कष्टाचं काम आहे. एकदा तर एका व्यक्तीला सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे पहाटे 2 वाजता त्याच्यावर चाकूने हल्लाही झाला होता.”
पाठदुखी नसती, तर वडा पावचा स्टॉल लावला असता
लक्षात घ्या की वापरकर्ता अनुभवातून आणखी निराश झाला. MBA करूनही योग्य नोकरी शोधण्यात अडचणी येत होत्या, ज्यामुळे छोटा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना अधिकच आकर्षक वाटली. या रेडिट वापरकर्त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “कधीकधी मला वाटतं, मला पाठदुखी नसती, तर मी वडा पाव किंवा रामेनचा स्टॉल सुरू करू शकलो असतो, किंवा ऑनलाइन स्टोअर्सपेक्षा चांगल्या किमतीत मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकू शकलो असतो.”

