त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : मुंबई येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्यावतीने 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या दागिने विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. हंस टॉकीज रोड येथील नव्याने सुरू झालेल्या हॉटेल राजपथ बिकॉन येथील पक्वान प्राईम हॉलमध्ये प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक कन्नुभाई ठक्कर यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी पेडणेकर समूहाच्या सपना गावकर यांनी या प्रदर्शनामागची पार्श्वभूमी सांगितली. ग्राहकांना विविध डिझाईनमधील नाविण्यपूर्ण दागिने उपलब्ध व्हावेत या उद्देशानेच बेळगावमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 17 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सुरू असून, नागरिकांनी या प्रदर्शनामध्ये येऊन दागिन्यांची खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद
ग्राहकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दागिन्यांवर 25 टक्केपर्यंत मेकिंग चार्जेसवर सूट असणार आहे. कन्नुभाई ठक्कर यांनी या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
