Headlines

Uddhav Thackeray Big Claim About CM Devendra Fadnavis


उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबाबत मोठं भाकीत केलं आहे. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तरी आपल्याला नवल वाटणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत नवं भाकीत वर्तवलं आहे. “बघताना वरवर वाटतं की, शिवसेनेचे खासदार ह्यांनी फोडले आहेत. पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा, फुटलेले खासदार ज्या शिंदे सेनेते गेले आहेत, त्या गुलामांचे काही भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीय. कारण वापरा आणि फेका ही भाजपची नीती आहे. मग हे 6 खासदार भाजपात का नाही गेले? कारण भाजपात अंतर्गत गटबाजी आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली तरी मला नवल नाही वाटणार. हे मोठं कट कारस्थान सुरु आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, दिल्लीत जे सुरु झालं आहे, आता जे बसले आहेत त्यांच्यानंतर कोण, त्यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत त्या सर्वांचा पत्ता 2029 पर्यंत कट होतो की नाही ते बघा”, असा देखील दावा उद्धव ठाकरेंनी केला.

ठाकरेंचा शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल मोठा दावा

“3 वर्षे राहिले आहेत. मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान होते. त्यांच्या चेहऱ्यावर मध्य प्रदेशची निवडणूक भाजप जिंकली होती. अत्यंत लोकप्रिय माणूस. त्यांना अडगळीत टाकलं. त्यांचं कोणी आता नाव घेत नाही. कारण कदाचित ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले असते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंचं नितीन गडकरींबद्दल मोठं वक्तव्य

“त्याआधीही नितीन गडकरी. आपल्या महाराष्ट्राचा मराठी माणूस. ते भाजपचे अध्यक्ष होते. दुसरी टर्म मिळत होती. पण बरोबर त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या, त्यांना परत अध्यक्षपदाची संधी दिली नाही. का? कारण परत अध्यक्ष झाले तर संघ त्यांना पंतप्रधानपदावर बसवेल. संघाचा पाठिंबा गडकरींना होता. नितीन गडकरी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून त्यांचे पंख छाटले गेले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरेंचा खळबळजनक दावा

“आतादेखील तेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायचं स्वप्न बघत आहेत. पंतप्रधान पदाची स्वप्ने बघत असतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना इथल्या इथे संपवण्यासाठी ही गद्दारी केली जात आहे. डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार देण्यापेक्षा बाजूला ठेवले. कारण जेव्हा ते पंतप्रधानपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देणार नाहीत तर मला देतील, अशी ही चाल आहे. हा महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आघात होणार आहे. एवढे आम्ही दुधखुळे नाहीत. आम्ही लढूच. तुम्ही जी गद्दारी करत आहेत, आम्ही तुम्हाला संपवणारच. हे भाजपांतर्गत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेली फोडाफोडी आहे”, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा