Ulhasnagar Shivsena-BJP: महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असून महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे.

जोपर्यंत निकम आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत नाहीत, तोपर्यंत शहर भाजपकडून महापालिकेत महापौर आणि शिवसेनेसोबत असहकार सुरू राहील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी युतीतील तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. निवडणुकीपूर्वी टीम ओमी कलानी गट शिवसेनेत सहभागी झाला. संख्याबळाच्या आधारे कलानी गटाचे कट्टर समर्थक असलेल्या निकम यांच्या पत्नी अश्विनी निकम यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली . टीम कलानी आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असतानाही सत्तेच्या समीकरणासाठी भाजपला शिवसेनेत आलेल्या कलानी गटासोबत जुळवून घ्यावे लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विकासकामांच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र आहे.
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका, महाराष्ट्राला 40 टक्के कमिशनचे ग्रहण असल्याचा दावाउल्हासनगरमधून जाणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदेबाबत आयलानी यांनी माध्यमांना माहिती दिली होती . त्यानंतर कमलेश निकम यांनी आमदार केवळ श्रेय लाटत असल्याची टीका केली . या वक्तव्यामुळे भाजपमध्ये असंतोष वाढला. अखेर भाजपने आमदार, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत निकम यांच्यावर टीका केली.
Chandrashekhar Bawankule: टीका करणारे फार काळ टिकत नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना टोला… अन्यथा असहकार
उल्हासनगरमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजप युती आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेले निकम युतीत सातत्याने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निकम यांना त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबाबत समज द्यावी. अन्यथा यापुढे महापौर आणि शिवसेनेसोबत भाजप असहकाराची भूमिका घेईल, असा इशारा आयलानी यांच्यासह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.

