IND vs SL 1st Test : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला सामना उद्या सकाळी सुरू होणार आहे. भारताचा ६००वा कसोटी सामना असणार असून तोही स्वातंत्र्यदिनी आल्याने आणखी महत्त्व वाढले आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत गिल काय ्म्हणाला जाणून घ्या.

देशासाठी ६०० वी कसोटी खेळणं हा प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाचा क्षण असतो. पण त्याच सामन्यात कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणं आणि तेही १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करणं, हा माझ्यासाठी दुहेरी सन्मान आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षण असल्याचं शुभमन गिल म्हणाला.
Ronaldo Georgina Rodriguez News: रोनाल्डो जॉर्जिना 10 वर्ष एकत्र, 5 मुलांनंतर लग्नाचा निर्णय; पण पहिल्या बाळापासूनच दोघांमधील कथित करार सोप्या शब्दात, महिन्याला 1 कोटीची डील
मी कर्णधाराची भूमिका आत्मविश्वासाने पार पाडत आहे. संघाचे टार्गेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे असून त्यासाठी ६ ते ७ टेस्ट जिंकणे गरजेचे आहे, त्यामुळे येथूनच चांगली सुरुवात करायची आहे. गुरनूर ब्रार जुना चेंडू आणि चांगल्या उसळीमुळे उपयुक्त आहे, तर प्रसिद्ध कृष्णानेही वार्म-अप मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामुळे अंतिम ११ ठरवणे कठीण आहे. बुमराह या दौऱ्यात नसल्याने इतर खेळाडूंसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असल्याचं शुभमन गिल याने म्हटलं आहे. दुर्दैवाने साई सुदर्शनची दुखापत अपेक्षेप्रमाणे लवकर बरी झालेली नाही. कसोटी सामन्यात कोणताही धोका पत्करता येणार नसल्यामुळे त्याला संघात घेता येणार नाही. तरीही आम्हाला आमच्या १५ खेळाडूंच्या संघावर पूर्ण विश्वास असल्याचं शुभमन गिल म्हणाला.
IND vs SL Test Playing 11 : श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत बुमराहची जागा कोण भरून काढणार? गंंभीरकडे 2 पर्याय, पाहा कोण?
शुभमन गिलच्या या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसते की, उद्याच्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजसोबत प्रसिद्ध कृष्णा हा अंतिम ११ मध्ये खेळणार आहे. रविंद्र जडेजासोबत मानव सुतार हा दिसणार हे सुद्धा निश्चित आहे. कारण मानव हा फलंदाजी करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. अनुभव आणि आत्मविश्वास हा वेळेनुसार येत असतो. त्यासाठी मैदानावर खेळून धावा काढायला हव्यात, असंही गिलने म्हटलं आहे.
दरम्यान, कुलदीप यादव, मानव सुतार आणि रवींद्र जडेजा हे तिघे १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळणार असल्याचे मॉर्केल यांनी संकेत दिले होते. त्यानुसार प्लेइंग ११ दिसत आहे. गिल या गोलंदाजांचा ठरावीक वेळी कसा वापर करतो यावर सर्व अवलंबून आहे; पण कौशल्याचा विचार केला तर आमच्यासाठी २० बळी घेण्याची क्षमता या तिघांमध्ये नक्कीच असल्याचं मॉर्केल म्हणालेले.
BAN vs AUS Test : पहिल्याच दिवशी तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरूद्ध बॅकफूटवर पण भारताचं टेन्शन का वाढलं? जाणून घ्या
भारतीय संभाव्य प्लेइंग 11 : के.एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (C), ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुतार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

