Headlines

FD Maturity Repayment Delay ; FD Mature झालीये, तरीही पैसे देण्यात बँक उशीर करतेय? अशावेळी लक्षात असूद्या या महत्वाच्या गोष्टी


एफडी Mature झालीये. पण बँकेकडे पैशांची मागणी केली तर बँक पैसे देण्यात उशीर करत आहे? अशावेळी काही गोष्टी लक्षात असणे फार गरजेच्या आहेत. जर बँक पैसे देण्यात फारच उशीर करत असेल तर आधी बँकेकडे तक्रार करण्यात यावी. बँकेने तक्रारीची नोंद घेण्यात आणि त्या संबंधित पाऊल घेण्यातही उशीर केला तर खातेधारकाकडे आणखीन काही मार्ग आहेत.

FD Maturity Repayment Delay
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनेकदा FD Mature होऊनसुद्धा बँकेकडून पैसे मिळवण्यात उशीर होतो किंवा बँक स्वतः पैसे देण्यात उशीर करते. जर सदर प्रकरणात बँकेचा मनमानी कार्यभार असल्याचे लक्षात आल्यास तक्रार करणे आवश्यक होऊन जाते. FD Mature झाला आहे, आपण मागणी करूनही पैसे देण्यात बँक उशीर करत असेल तर संबंधित बँकेकडे आधी तक्रार करण्यात यावी. बँकेकडे तक्रार करताना खातेधारकाकडे FD प्रमाणपत्र, FD क्रमांक, मॅच्युरिटी डेट तसेच बँकेचे स्टेटमेंट आणि बँकेने पैसे का रोखले याचे कारण या संबंधित पुरावे असणे आवश्यक असते. जर बँकेने पैसे न देण्याचे कारण दिले तर ते लेखी स्वरूपात मागण्यात यावे.

जर बँकेकडे तक्रार करूनही प्रश्न सुटत नसेल तर अशावेळी RBI Integrated Ombudsman Scheme अंतर्गत तक्रार करता येते. ग्राहकांचे बँकेसंबंधीत असणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आरबीआईची ही अधिकृत योजना आहे. तक्रारीच्या 30 दिवसानंतरही बँकेकडून काहीच उत्तर आले नाही तर आरबीआईच्या या योजनेचा पर्याय निवडावा. जर यातूनही प्रश्न सुटला नाही तर ग्राहक आयोगाकडे जावे.

केरळ राज्यात घडला सारखाच प्रकार

केरळ राज्यातील सहकारी बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकाने 5 लाखांची FD Mature झाल्यामुळे संबंधित बँकेकडून पैसे मागितले. खातेधारकला पैसे देण्यामध्ये बँकेकडून उशीर होऊ लागला. नेहमी तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगण्यात आले. एफडीचे पैसे मिळवण्यासाठी अर्ज करून जवळजवळ 4 ते 5 वर्ष निघून गेले तरीही खातेधारकाच्या हातात त्याचे पैसे काही आले नाही. त्यामुळे खातेधारकाने ग्राहक आयोगाकडे तक्रार केली.

ग्राहक आयोगाने संबंधित बँकेला खातेधारकाला त्वरित एफडीची रक्कम त्यावर 12% व्याज आणि 10,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येण्याचे निर्देश दिले. 2021 मध्ये करण्यात आलेल्या या अपीलला 2026 मध्ये बँकेद्वारे फेटाळण्यात आले. बँकेचे असे म्हणणे होते की त्यांची सहकारी बँक असून ते सहकारी बँकांच्या नियमाअंतर्गत कार्यरत आहेत, ग्राहक आयोगाशी त्यांचा संबंध नाही.

केरळ हायकोर्टात मोठ्या खंडपीठाने बँकेने केलेल्या युक्तिवाद फेटाळला असून ग्राहक आयोगाच्या अपीलप्रमाणे तक्रार करणाऱ्या त्या खातेधारकाला पैसे अर्ज करण्याच्या तब्बल 11 वर्षांनी एफडीची रक्कम, त्यावर 12% ने व्याज तसेच नुकसानाची भरपाई म्हणून 10,000 रुपये दंड मिळणार आहे. दरम्यान, केरळ हायकोर्टाने संबंधित बँकेला आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.

दिवेश दिनेश

लेखकाबद्दलदिवेश दिनेशदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा