Headlines

WPI Inflation Rate July 2026 ; महागाईचा दर घसरला पण सामन्यांच्या खिशावरील भार कायम; डब्ल्यूपीआयचा नवा आकडा जाहीर, इंधनाच्या किंमतीत मोठा बदल


जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्याचा घाऊक बाजारातील महागाईचा आकडा पाहिला तर काही प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. घाऊक बाजारातील महागाईचा आकडा घसरला आहे. जरी महागाईचा दर घसरला असला तरी अजून खुश होण्यासारखं काहीच घडलं नाहीये. फक्त एकाच क्षेत्रातील घाऊक बाजारपेठेत महागाईचा दर घसरला आहे. देशातील इतर क्षेत्रांतील घाऊक बाजारपेठेत हा दर वाढलेला आहे.

जुलै 2026 महिन्यातील डब्ल्यूपीआय महागाईचा दर पाहिला तर तो जून 2026 पेक्षा 0.9% ने घसरला आहे. जून 2026 महिन्यात हा दर 9.87% इतका होता. जुलै 2026 मध्ये हा दर 9.78% पर्यंत घसरला आहे. डब्ल्यूपीआय म्हणजे घाऊक बाजारात वस्तूंच्या किंमतीत होणारा चढउतार मोजण्याची पद्धत. जुलै 2026 च्या रिपोर्टनुसार, महागाईचा दर जरी घसरला असला तरी त्यात फक्त एकाच क्षेत्राचे योगदान आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाईच्या दरातच घसरण झाली आहे, या घसरणीचा परिणाम म्हणून एका महिन्यात डब्ल्यूपीआय महागाईचा दरात 0.9% घसरण नोंदवण्यात आली आहे.

इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात झालेली घसरण

डब्ल्यूपीआय आकडेवारीनुसार, इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. जून 2026 महिन्यात आकडा 27.41% वर होता, तर हाच आकडा घसरून जुलै 2026 महिन्यात 20.05% वर आला आहे. याच घसरलेल्या आकड्यामुळे डब्ल्यूपीआय महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.

आता इंधन व ऊर्जा क्षेत्राच्या घाऊक पेठेत घसरण, मग पेट्रोल-डिझेलचं काय?

जून 2026 मध्ये फ्यूल आणि पॉवर महागाई दर 27.41% होता तर तो घसरून 20.05% वर आला आहे. Mineral Oils च्या महागाईचा दर 32.4% इतका होता तर क्रूड पेट्रोलियम आणि नॅच्युरल गॅसचा दर 26.99% इतका होता. हा दर घाऊक बाजारपेठेविषयी असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या रिटेल किंमतीत थेट बदल होण्यास वेळ लागू शकतो. त्याचप्रमाणे, जरी घाऊक बाजारपेठेत इंधनांचा दर घसरला असला तरी पेट्रोल-डिझेलसंबंधित कर, डीलर कमिशन तसेच इतर घटकांच्या किंमतीचा प्रभावही पेट्रोल-डिझेलच्या रिटेल किंमतीवर पडतो.

कोण कोणत्या क्षेत्रात महागाईचा दर वाढला?

प्राथमिक वस्तूंच्या डब्ल्यूपीआय दरात वाढ दिसून आली आहे. जून 2026 महिन्यात हा दर 7.00% इतका होत. जुलै महिन्यात या दरात 1.52% ची वाढ दिसून आली होती. दर 8.52% वर आला होता. कारखान्यात प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या विनिर्मित वस्तूंच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. जून 2026 महिन्यात हा आकडा 7.48% इतका होता तर जुलै 2026 मध्ये हा आकडा 8.29% नोंदवण्यात आला आहे.

Maharashtra Timesआजोबांचे जुने पेपर शेअर्स नातवाला मिळणे शक्य! Demat खात्याशी जोडून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्याखाण्याच्या वस्तुही महागल्या

खाद्यपदार्थांचा डब्ल्यूपीआय पाहिला तर जून 2026 महिन्यात दर 6.14% होता जो जुलै 2026 महिन्यात 6.65% झाला. एकंदरीत, 0.51% ची वाढ नोंदवण्यात आली. जुलै 2026 चा डब्ल्यूपीआय दर 0.9% ने घसरला तरी सामन्यांच्या खिशावरचा भार आणखीन वाढल्याचे दिसून येत आहे.

दिवेश दिनेश

लेखकाबद्दलदिवेश दिनेशदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत