Headlines

ketan agarwal murder case scene recreation; केतनला दरीत ढकलल्यानंतर सिया-चेतन पुन्हा लोहगडावर, पोलिसांनी सीन रिक्रएशनमधून जे करुन घेतलं त्यातून काय समोर आलं?


Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेऊन सीन रिक्रिएशन केला आहे. तपासात आरोपींकडून हा सगळा कट कसा रचला यासंबंधी माहिती समोर आली आहे. सिया आधी एकटीच केतनला संपवणार होती पण नंतर चेतनची मदत तिला घ्यावी लागली, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

ketan agarwal murder case scene recreation
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात रविवारी महत्त्वाची घडामोड घडली. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी थेट लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. नेमके काय घडले, कोण कुठे उभे होते आणि केतनला दरीत कशा परिस्थितीत ढकलण्यात आले, याची पडताळणी पोलिसांनी आरोपींकडून करून घेतली. या तपासातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी खून करण्याच्या पद्धती, पुरावे नष्ट करण्याचे मार्ग आणि पोलिसांची दिशाभूल कशी करायची, याबाबत समाजमाध्यमांवर माहिती शोधली होती. तपासात असेही निष्पन्न झाले की, १४ जून रोजी सियाने केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर तिने चेतनला या कटात सहभागी करून घेतले.

सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. वडगाव मावळ न्यायालयाने त्यांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या काळात पोलिसांकडून त्यांच्या हालचाली, मोबाईलमधील माहिती आणि इतर पुराव्यांची सांगड घालण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी सियाच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. शुक्रवारी तिच्या भावाची चौकशी झाल्यानंतर शनिवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवले. या चौकशीतूनही तपासाला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra TimesAccident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकवर वॅगनआर कार आदळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू

रविवारी सकाळी आरोपींना घेऊन पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा करून प्रत्येक टप्प्याची पडताळणी करण्यात आली. केतनला कोणत्या ठिकाणी नेण्यात आले, नेमक्या कोणत्या जागेवरून दरीत ढकलण्यात आले आणि त्यानंतर आरोपींनी काय केले, याची माहिती पोलिसांनी आरोपींकडून घेतली.

१८ जून रोजी केतन अगरवालचा लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अगरवाल कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर सिया गोयल व चेतन चौधरी यांनी आखलेल्या कटाचा उलगडा झाला. आता घटनास्थळी झालेल्या पुनर्रचनेनंतर या प्रकरणातील तपास आणखी महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे मानले जात आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा