Nagpur Umred Deputy Registrar Sudhakar Nimje Transfer Employees Emotional in Office; ‘निमजे साहेबांची बदली झाली’; ऐकताच ऑफिसमध्ये धावपळ, सहकारी मिठी मारुन लेकरासारखे ढसाढसा रडले, तीन वर्ष कुटुंबासारखे राहिले
Nagpur Umred Deputy Registrar Sudhakar Nimje Transfer Employees Emotional in Office; ‘निमजे साहेबांची बदली झाली’; ऐकताच ऑफिसमध्ये धावपळ, सहकारी मिठी मारुन लेकरासारखे ढसाढसा रडले, तीन वर्ष कुटुंबासारखे राहिले
Nagpur Sudhakar Nimje Transferred : नागपूरातील दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर निमजे यांची अचानक बदली झाली. त्यामुळे विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
उमरेड सुधाकर निमजे बदली कर्मचारी भावूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : शासकीय सेवेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असला, तरी काही व्यक्तींच्या बदलीचा क्षण हा सहकाऱ्यांसाठी भावनिक ठरतो. नागपूर जिल्ह्यातील उमरेड उपविभागातील कुही तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर निमजे यांची कळमेश्वर येथे बदली झाली. त्यांच्या बदलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात सहकाऱ्यांचे डोळे अक्षरशः पाणावले. निमजे यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना अनेक सहकाऱ्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
सहकाऱ्यांच्या मनात वेगळे स्थान
सुधाकर निमजेयांनी कुही येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तीन वर्षे जबाबदारी सांभाळली. या कालावधीत त्यांनी कार्यालयीन कामकाजासोबतच सहकाऱ्यांशी असलेले संबंधही आपुलकीने जपले. मनमिळावू स्वभाव, साधेपणा, सहकार्याची भावना आणि प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याची पद्धत यामुळे त्यांनी अल्पावधीतच सहकाऱ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
कार्यालयीन कामकाजाच्या धावपळीतही सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि गरजेनुसार त्यांना सहकार्य करणे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग राहिला. त्यामुळे निमजे यांचे आणि कार्यालयातील सहकाऱ्यांचे नाते केवळ अधिकारी-कर्मचारी इतकेच मर्यादित राहिले नाही. त्यांनी माणुसकी आणि आपलेपणाच्या भावनेतून हे संबंध जपल्याने त्यांच्या बदलीची बातमी समोर आल्यानंतर अनेक सहकाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
निरोप समारंभात सहकाऱ्यांनी निमजे यांच्या कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्वभावातील आपुलकी, सहकार्याची वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. तीन वर्षांच्या कालावधीत निर्माण झालेले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध त्यांच्या बदलीच्या वेळी प्रकर्षाने जाणवले. यावेळी सहकाऱ्यांनी सुधाकर निमजे यांना कळमेश्वर येथील नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवीन ठिकाणीही त्यांच्या कार्याचा ठसा उमटेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निरोपाचे शब्द सुरू असताना काही सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण वातावरण भावूक झाले.
बदलीनंतरही कुही कार्यालयातील सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. एका अधिकाऱ्याला मिळालेला हा भावनिक निरोप त्यांच्या कार्यपद्धतीसोबतच त्यांनी माणूस म्हणून कमावलेल्या विश्वासाची आणि आपुलकीची साक्ष देणारा ठरला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा