![]()
यंदा जिल्ह्यात २४६ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७५ मिमी अधिक पाऊस होऊनही पाणीटंचाई कायम आहे. मार्चपासून सुरू असलेले पाणी टँकर ऑगस्टमध्येही सुरू आहेत. जिल्ह्यात तब्बल १०० टँकरच्या माध्यमातून १ लाख ९५ हजार ३२१ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, या १०० टँकरमध्ये केवळ चार शासकीय, तर तब्बल ९६ खासगी टँकर आहेत. या टँकरद्वारे जिल्ह्यातील ५०९ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे प्रमाण सर्वदूर समान नसल्याने अनेक भागांत भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकर सुरू असून, त्यापैकी एक शासकीय आणि ४० खासगी आहेत. ३१ गावांतील ७७ हजार ६७९ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अहिल्यानगर तालुक्यात १८ टँकर सुरू असून, शेवगाव, कर्जत, जामखेड, संगमनेर, पारनेर आणि नेवासा तालुक्यांतही टँकर सुरू आहेत. दमदार पावसावर टँकरचे भवितव्य अवलंबून पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास विहिरी व बोअरवेलची भूजल पातळी वाढून टँकरची गरज कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्टअखेर समाधानकारक पाऊस न झाल्यास सप्टेंबरमधील परतीचा पाऊस टँकरचे भवितव्य ठरवणार आहे.
Source link
246 मिमी पाऊस तरी 100 टँकर सुरू:1.95 लाख नागरिकांना टँकरचा आधार
