Headlines

MSRTC Bus Stolen From Jamner Depot Thieves Abandon It After Tyre Puncture Video Viral | चोरट्यांनी चक्क एसटी बसच पळवली, पण टायर पंक्चर झाल्याने डाव फसला, जळगावमधील व्हिडीओ व्हायरल


जळगावच्या जामनेर डेपोतून MSRTC ची नवी बस चोरीला गेली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टायर पंक्चर झाल्यानंतर चोरट्यांनी बस वाटेतच सोडून दिली. पण या प्रकरणामुळे डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

MSRTC bus theft
(फोटो सौजन्य – @PophleeGor51025/x.com)
कालपर्यंत चोर मंडळी लोकांच्या घरांमध्ये दरोडे टाकत होते. पण आता तर त्यांचं धाडस इतकं वाढलंय की, सरकारी मालमत्ता चोरायलादेखील ते मागेपुढे पाहत नाहीयेत. असंच एक प्रकरण जळगावमध्ये घडलं. चोरांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नवी बस चोरून नेली. पण ही घटना डेपोमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी MSRTC प्रशासनाकडे केली जात आहे.

बस कशी झाली चोरी?

हा व्हिडीओ @PophleeGor51025 या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर घडलं असं की, जळगाव जिल्ह्यातील जामनेर डेपोतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चोरांनी पळवून नेली. पण सुदैवाने काही अंतरावर गेल्यानंतर बसचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चोरट्यांनी या बसला तिथेच सोडून पळ काढला. कारण बस पुढे नेणं त्यांना शक्य नव्हतं. अर्थात, ही चोरी डेपोमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. पण या प्रकरणामुळे डेपोतील सुरक्षा व्यवस्थेवर मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

या घटनेनंतर जामनेर डेपोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डेपोतून नवीन बस चोरट्यांनी कशी बाहेर नेली? या चोरीमध्ये तेथील कुणा कर्मचाऱ्याने त्यांना मदत केली होती का? किंवा सुरक्षा प्रणालीत काही त्रुटी होत्या का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसंच, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक कामाला लावलं आहे. असो, पण या व्हायरल व्हिडीओवर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा