झोमॅटो, स्विगी, ब्लिंकीट, ओला, उबर आणि अर्बन कंपनी यांसारख्या कंपन्यांशी संबंधित प्लॅटफॉर्म कामगार NPS द्वारे निवृत्तीसाठी निधी तयार करू शकतात. विशेष गिग वर्कर्स NPS मध्ये फक्त 99 रुपयांपासून योगदान सुरू करू शकतात आणि कमाई आणि सोयीनुसार पुढील योगदान कमी-जास्त करू शकतात.
गिग वर्कर्ससाठी 99 रुपयांची पेन्शन योजना
PFRDA ने सांगितले की, प्लॅटफॉर्म कामगार आता सोयीनुसार NPS मध्ये गुंतवणूक करू शकतील. तसेच अशा लोकांचे काम पुढील बुकिंगवर अवलंबून असले तरीही त्यांच्या निवृत्तीबाबत असं होणार नाही, असेही नियामकाने स्पष्ट केले. या नवीन उपक्रमांतर्गत गुंतवणुकीसाठी कोणतेही कठोर नियम लागू केलेले नाही तर गिग कामगार फक्त 99 रुपयांच्या छोट्या योगदानाने पेन्शन खाते सुरू करू शकतात, जेणेकरून त्यांच्यात आर्थिक दबाव येणार नाही.
प्लॅटफॉर्म कामगारांसाठी NPS नेमकं काय?
PFRDA ने 29 ऑक्टोबर 2025 च्या परिपत्रकाद्वारे Gig आणि प्लॅटफॉर्म कामगारांना NPS शी जोडण्यासाठी NPS ई-श्रमिक (प्लॅटफॉर्म सर्व्हिस पार्टनर) मॉडेल लाँच केले होते. या अंतर्गत झोमॅटो, स्विगी, ब्लिंकीट, ओला, उबर आणि अर्बन यांसारख्या कंपन्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग कामगार NPS चे लाभ घेऊ शकतात.
या मॉडेलनुसार NPS मध्ये योगदान देण्याची पद्धत NPS कॉर्पोरेट मॉडेलसारखीच आहे, पण विशेषतः प्लॅटफॉर्म कामगारांसाठी आहे. विशेष बाब म्हणजे प्लॅटफॉर्म एग्रीगेटर्सना NPS साठी PFRDA मध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नाही त्याऐवजी, पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स एग्रीगेटर्सशी टाय-अप करू शकतात आणि त्यांच्या कामगारांना NPS शी लिंक करणे आणि खाती उघडणे यासारख्या सेवा देऊ शकतात.
प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांनी NPS मध्ये योगदान कसे द्यावे?
प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांना NPS मध्ये योगदान देण्याची पद्धत बरीच फ्लेक्सिबल आहे. प्लॅटफॉर्म आणि कर्मचारी मिळून, कर्मचारी एकट्याने, किंवा केवळ प्लॅटफॉर्म एग्रीगेटरद्वारे योगदान केले जाऊ शकते. तसेच NPS मध्ये योगदान करण्यासाठी कोणतीही कमाल किंवा किमान योगदान नाही, पण प्लॅटफॉर्म आणि कर्मचारी प्रत्येक योगदानासाठी किमान रकमेवर परस्पर सहमत होऊ शकतात.
म्हणजे कर्मचाऱ्यांना दरमहिन्याला एक मोठी रक्कम, निश्चित रक्कम जमा करणे आवश्यक नाही जे त्यांच्या कमाई आणि प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध पर्यायांच्या आधारावर हळूहळू रिटायरमेंट फंडातील बचत वाढवू शकतात.
99 रुपयांत करा रिटायरमेंटची तयारी
अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की एखादा प्लॅटफॉर्म कर्मचारी वयाच्या 25व्या वर्षी दरमहिन्याला फक्त 99 रुपये गुंतवून NPS मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतो आणि 35 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास रिटायरमेंटला किती निधी मिळेल आणि पेन्शन तयार होऊ शकते? कालांतराने गुंतवणुकीत वार्षिक 5% किंवा 10% वाढ केल्यास काय परिणाम होईल? शिवाय, दरमहा 999 रुपये एनपीएसमध्ये गुंतवले, तर अंदाजित पेन्शन किती असू शकते?
25व्या वर्षी दरमहा 99 रुपयांची गुंतवणूक
एखाद्या प्लॅटफॉर्म वर्करने वयाच्या 25 व्या वर्षांपासून दरमहिन्याला 99 रुपये गुंतवणूक सुरू केल्यास 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवली तर, या कालावधीत एकूण गुंतवणूक रक्कम 41,580 रुपये होईल. यावर 12% सरासरी वार्षिक परतावा गृहीत धरल्यास 35 वर्षांनंतर अंदाजित सुमारे 5.45 लाख रुपये रिटायरमेंट फंड तयार होऊ शकतो.
यापैकी चक्रवाढीमुळे अंदाजे 5.03 लाखांचा फायदा मिळेल. यापैकी 60% रक्कम, म्हणजेच अंदाजे 3.27 लाख रुपये, एकरकमी काढता येईल, तर 40% रक्कम, म्हणजेच अंदाजे 2.18 लाख, ॲन्युइटीसाठी गुंतवली जाईल. ॲन्युइटीवर 6.50% वार्षिक परतावा मिळेल असे गृहीत धरल्यास दरमहा अंदाजे 1,181 रुपयांचे पेन्शन मिळेल.

