Headlines

Pune Moshi Garbage Depot Accident Nagesh Gaikwad Wife Sonali Gaikwad ends life; मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू, महिन्याभरात पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्य संपवलं, चिमुकल्या श्रेया-प्रियाचं छत्र हरपलं


Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत २९ वर्षीय नागेश गायकवाड यांच्या मृत्यूचा धक्का कुटुंब पचवत असतानाच आणखी एक हादरा बसला. पतीनिधनानंतर तणावात असलेल्या २३ वर्षीय पत्नी सोनाली गायकवाड यांनी आयुष्याची अखेर केली. त्यामुळे चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, वृद्ध आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Moshi Garbage Depot Nagesh Gaikwad Wife Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पुणे : मोशी कचरा डेपो दुर्घटनेने आधीच हादरलेल्या गायकवाड कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत पती नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात त्यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड यांनी आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नागेश-सोनाली यांच्या पश्चात चार वर्षांची श्रेया आणि दीड वर्षांची प्रिया या दोन मुली, आई-वडील आणि मोठा भाऊ स्वप्नील असा त्यांचा परिवार आहे.

पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सोनाली सावरलेल्या नव्हत्या. नागेश यांच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात आणि दुःखी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी जीव देण्यामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दोन मुली दुसऱ्या खोलीत; दिराने दरवाजा तोडला

बुधवारी रात्री सोनाली गायकवाड यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यावेळी त्यांच्या दोन चिमुकल्या मुली घरातील दुसऱ्या खोलीत होत्या. मुली रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांच्या दिराने खोलीतून आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

परिस्थिती संशयास्पद वाटल्याने दिराने खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सोनाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Maharashtra TimesGhatkopar Landslide : डोळ्यात स्वप्नं घेऊन आले, बहिणीच्या परिवारासह मुंबई फिरले, नियतीचा क्रूर घाला, चौकोनी कुटुंबाचा चटका लावणारा शेवटसोनाली यांचे दीर तसेच सासू-सासरे घरातील बाजूच्या खोलीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांच्या उपस्थितीत असतानाही ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महिनाभरातच दोन्ही पालक गमावले

गायकवाड दाम्पत्याला दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोन चिमुकल्यांनी वडील नागेश गायकवाड यांना गमावले होते. वडिलांच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच आता आई सोनाली यांचाही मृत्यू झाला आहे.

अवघ्या महिनाभराच्या कालावधीत आई-वडील दोघांनाही गमावल्याने या दोन चिमुकल्या मुलींवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलींच्या भवितव्याबाबतही आता प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.

लेकींच्या भविष्यासाठी झटणारा हात थांबलासंजय गांधीनगर, मोशी

संजय गांधीनगर, मोशी येथील रहिवासी असलेले २९ वर्षीय नागेश सर्जेराव गायकवाड तीन वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. दुर्घटनेच्या वेळी प्रशासकीय इमारतीत असताना कचऱ्याचा ढिगारा कोसळला आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी नागेश यांनी नोकरी स्वीकारली होती. स्वतःचे घर उभे करणे आणि मुलींना शिकवणे हे त्यांचे ध्येय होते, मात्र एका मागून एक घडलेल्या घटनांनी सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून तपास

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सोनाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Maharashtra TimesCrime News : लग्नाला अवघे काही महिने उरलेले, आधी 25 वर्षीय तरुणीचा गूढ मृत्यू, काही तासांनी 26 वर्षीय भावी पतीचा लॉजमध्ये अंत

मोशी दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू

जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. केवळ नऊ कामगारांचे जीव घेतले नाहीत, तर नऊ कुटुंबांचा आधार, स्वप्ने आणि उद्याची आशाही हिरावून घेतली. कुणाच्या चिमुकल्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, कुणाचा नव्याने फुललेला संसार अर्ध्यावर मोडला, तर कुणाच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार कायमचा निघून गेला. कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे हे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडकळीस आला. या घटनेने सर्वत्र हळहळ आणि संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा