Headlines

सिंधुदुर्ग शिक्षण विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती


सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. दोन्ही विभागांचे शिक्षणाधिकारी सध्या प्रभारी स्वरूपात तात्पुरता कार्यभार सांभाळत आहेत. मात्र, आता प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सुबोध माने यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.

तसेच, वेंगुर्ले व मालवण गटशिक्षणाधिकारी पदांवरही नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार अजय पोपटठाणे, तर मालवण गटशिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार अनिकेत कोथंमिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, नवनियुक्त वेंगुर्ले व मालवण गटशिक्षणाधिकारी यांनी आज जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी सभापती राऊळ यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नितीन राऊत, गुरुनाथ पेडणेकर तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता परब आदी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत