शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. याआधीही रात्री उशिराने वर्षा बंगल्यावर जाऊन जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादीही NDA मध्ये सामील होणार अशा चर्चा असतानाच जयंत पाटील आणि फडणवीसांच्या या विमान प्रवासानेही चर्चा रंगल्या. यावर आता जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे.