Pune Baramati Woman Dies after Physical Relations with Boyfriend Atharva taking Pill Mother Accuses Crime News; लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोप
Pune Baramati Woman Dies after Physical Relations with Boyfriend Atharva taking Pill Mother Accuses Crime News; लग्न ठरलेल्या प्रियकराशी गोळी घेऊन संबंध, बारामतीत तरुणीचा गूढ मृत्यू, मैत्रिणीच्या हवाल्याने आईचा मोठा आरोप
Pune News : 27 वर्षीय अथर्व मेहन वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मयत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बारामती : पुणे जिल्ह्यातीलबारामती शहरात तरुणीचा अकस्मात संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपी अथर्व राजेंद्र मेहन (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह करुन काही गोळ्या देत असल्याचे मयत मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने केला आहे.
मयत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण केले होते. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी तिने ऑक्टोबर २०२५ पासून पुण्यात ट्यूशन्स लावल्या होत्या. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून आईला मिळाली होती.
आरोपी तरुणासोबत ठरलेला विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व फिर्यादीनुसार तरुणी आणि अथर्व यांच्या प्रेमसंबंधांनंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचा विवाहही ठरला होता. मात्र, काही दिवसांपासून ती शांत राहत असल्याचे आईच्या निदर्शनास आले. तिच्या मैत्रिणीने अथर्व वारंवार शारीरिक संबंधासाठी आग्रह धरीत असून, काही गोळ्या देत असल्याचे सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत करण्यात आला आहे.
रात्री प्रकृती बिघडली, उपचारापूर्वीच मृत्यू
सहा ऑगस्ट रोजी अथर्व तरुणीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी घेऊन गेला; अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी दौंडला जात असल्याचे सांगितले. आईने व्हिडिओ कॉल केला असता तरुणी अथर्वसोबत एका कारमध्ये असल्याचे दिसले. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आईने लेकीला फोन केला; मात्र तिने फोन उचलला नाही.
आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नकोस आणि तातडीने घरी परत ये, असे सांगितले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास आईने मेसेज केल्यावर मुलीने जेवण करत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर मात्र तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तेथून एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये जेवण करून दोघे अथर्वच्या घरी आले. रात्री दहाच्या सुमारास आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला आणि तिला चक्कर आल्याचे सांगितले.
रात्री प्रकृती बिघडल्यानंतर तिला विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वी तिचा मृत्यू झाला. औषधे, वैद्यकीय व डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
अथर्व तरुणीला घेऊन प्रथम देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोईटे हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे गेल्याचे सांगितले जाते. रात्री सुमारे १०.२० वाजता तिची आई सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिथे तरुणी स्ट्रेचरवर होती. मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी आईला समजले. या घटनेनंतर आईने मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा