Headlines

Mohammed Siraj Smashes 3 Sixes to Seal Indias Win Fans Flood Social Media With Memes | ‘DSP सिराजनं पुन्हा श्रीलंकेला धुतलं’, ३ षटकार मारून मिळवला विजय, फॅन्स मीम्समधून करताहेत कौतुक


India vs Sri Lanka warm-up match: श्रीलंका क्रिकेट XI विरुद्धच्या सराव सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं सलग तीन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे फॅन्स खुश आहेत. आणि मीम्सच्या माध्यमातून त्यानं कौतुक करत आहेत.

Mohammed Siraj viral memes
(फोटो सौजन्य – mowgli_vines/Instagram)
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं श्रीलंकेवर विशेष प्रेम असल्याचं दिसून येतं. कारण श्रीलंकेविरुद्ध तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. अन् तीच प्रथा त्यानं सराव सामन्यातही सुरू ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या ३ दिवसांच्या सराव सामन्यात त्यानं धमाकेदार फलंदाजी करून भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे फॅन्स खुश आहेत आणि मीम्सच्या माध्यमातून त्याच्या फलंदाजीचं कौतुक करत आहेत. चला, पाहूया सिराजवर व्हायरल होत असलेले मीम्स.

सलग तीन षटकारांनी विजय

​ ​

मोहम्मद सिराजने श्रीलंका क्रिकेट XI विरुद्धच्या सराव सामन्यात बॅटिंगमध्ये तुफानी कामगिरी केली. भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. सिराजने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकत भारताला शानदार विजय मिळवून दिला.

आशिया कपमध्येही चमकला

​ ​

सिराजने यापूर्वी देखील श्रीलंकेविरुद्ध खूप चांगली कामगिरी केली आहे. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यानं एका षटकात चार विकेट्स घेतल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्येही धुव्वा

​ ​

२०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये देखील सिराजने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. त्याने ७ ओव्हरमध्ये १६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५५ धावांवर भारतीय संघाने गुंडाळला होता.

गंभीरही हसू आवरेना

सिराजच्या या फटकेबाजीने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनाही हसू आवरलं नाही. संपूर्ण संघानं टाळ्या आणि शिट्या वाजवून सिराजच्या फलंदाजीचं कौतुक केलं आणि त्याला प्रोत्साहन दिलं.

सिराजच्या षटकारांवर मीम्स

सिराज उत्तम गोलंदाज आहेच, पण आता बॅटिंगमुळे देखील चर्चेत आहे. त्यानं मारलेले सलग ३ षटकार चर्चेचा विषय ठरत असून, नेटकरी त्यावर एकापेक्षा एक मजेशीर मीम्स शेअर करताना दिसत आहेत.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा