शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. याआधी जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन सुरू असताना शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आता खासदारांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा झाल्याचा दावा सुजात आंबेडकरांनी केला आहे.