सोलर पॅनल बसवताना त्यावर होणारा खर्च किती दिवसांत वसूल होईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. हे प्रामुख्याने तुम्ही निवडलेल्या सोलर सिस्टीमच्या क्षमतेवर अवलंबून असते. सरकारकडून मिळणारी सबसिडी वजा करून, उर्वरित 40 ते 70 टक्के गुंतवणूक साधारणपणे 3 ते 5 वर्षांत वीज बिलाच्या बचतीमधून पूर्णपणे वसूल होते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

आर्थिक फायदे
80 ते 90 टक्के वीज बिलात बचत: दरमहा येणारे विजेचे बिल खूप कमी होते. खर्च वसूल: सुरुवातीची गुंतवणूक वीज बिलाच्या बचतीमधून काही वर्षांतच परत मिळते. गॅरंटी: सौर पॅनलचे आयुष्य 25 वर्षांपेक्षा जास्त असते, ज्यामुळे दीर्घकाळ मोफत वीज मिळते. सबसिडी: केंद्र आणि राज्य सरकारकडून सोलर सिस्टीम बसवण्यासाठी मोठी सबसिडी मिळते. मूल्यात वाढ: सोलर बसवलेल्या घराची बाजारातील किंमत वाढते.
घर किंवा ऑफिसमध्ये सोलर सिस्टम बसवताना सबसिडी मिळूनही 40 ते 70 टक्के खर्च स्वतः करावा लागतो. त्यामुळे हा खर्च किती वर्षांत वसूल होणार, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. सोलर पॅनल लावल्यामुळे तुमचे वीज बिल 80 ते 90 टक्के कमी होते. या दरमहा होणाऱ्या बचतीमधून सुरुवातीचा खर्च पूर्णपणे भरून निघतो. हा खर्च किती दिवसांत निघेल, हे तुमच्या सोलर सिस्टमच्या क्षमतेवर अवलंबून असते. साधारणपणे 1 किलोवॅट (1kW), 3 किलोवॅट (3kW) आणि 5 किलोवॅट (5kW) क्षमतेच्या सोलर सिस्टमचा संपूर्ण खर्च वसूल होण्यासाठी 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागतो.
1 किलोवॅट सौर यंत्रणेची किंमत कधी वसूल होईल?
1 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा लहान घरांसाठी सर्वोत्तम आहे. जर घराचा विजेचा वापर सुमारे 120-150 युनिट असेल तर 1 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविणे योग्य आहे. आता या क्षमतेच्या सौर यंत्रणेची किंमत 50,000 ते 55,000 रुपयांच्या दरम्यान आहे, हे तुम्हाला माहिती हवे. यावर 30,000 रुपयांपर्यंत सरकारी अनुदान हे दिले जाते. अशावेळी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून 40-45 टक्के खर्च इतका करावा लागतो, जो 20 हजारांपासून 25 हजारांपर्यंत बसतो. या प्रणालीमुळे दरमहा सुमारे 800 ते 1,000 विजेची बचत होते. यानुसार, 3 ते 3.5 वर्षांच्या आत, आपल्याद्वारे केलेला निव्वळ खर्च पूर्णपणे वसूल केला जातो.
3 किलोवॅट सौर यंत्रणेची किंमत कधी वसूल होईल?
ही भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात चालणारी सौर यंत्रणा आहे. ही यंत्रणा खर तर 1 AC, फ्रीज, पंखा आणि टीव्हीचा भार सहजपणे उचलू शकते. यातून तुम्हाला दर महिन्याला सुमारे 360-400 युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. आता वळुया किमतीकडे. या क्षमतेच्या सौर यंत्रणेची किंमत 1,40,000 ते 1,60,000 रुपये दरम्यान आहे, ज्यात जास्तीत जास्त 78,000 रुपयांपर्यंत सरकारी अनुदान आहे. तुमच्या खिशातून 45-50 टक्के म्हणजे सुमारे 62 हजार ते 82 हजार खर्च करावे लागू शकतात. 3 किलोवॅट सिस्टम प्रत्येक महिन्याला आपले वीज बिल हे सुमारे 2,200 ते 2,600 ने वाचवते. आता यात तुमची वर्षाला 28 हजार ते 30 हजार इतकी बचत करण्यास अनुमती देते. संपूर्ण पैसे वसूल करण्यासाठी तुम्हाला 4 वर्ष लागतात.
5 किलोवॅट सौर यंत्रणेची किंमत कधी वसूल होईल?
तुमचे घर मोठे असेल आणि घरात 2 ते 3 एअर कंडिशनर, गीझर आणि हेवी-लोड उपकरणे असतील तर 5kW सिस्टम तुमच्यासाठी योग्य आहे. त्यातून रोज सुमारे 20-22 युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. या क्षमतेची सोलर सिस्टीम बसविण्याचा खर्च हा 2 लाख 30 हजार ते 2 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 78 हजार सरकारी अनुदान म्हणून मिळू शकतात. कारण 3 किलोवॅटपेक्षा जास्त सिस्टमवर 78 हजार रुपयांची सबसिडी आहे. खिशातून 1,52,000 रुपयांपासून 1 लाख 82 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. 5 किलोवॅट सिस्टम आपल्या वीज बिलावर दरमहा 3,500 ते 4,500 ची इचकी बचत देऊ शकते. म्हणजे तुमचे एका वर्षाला 45 हजार किंवा त्याहून अधिक बचत होऊ शकते. तुम्हाला खर्च वसूल करण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतात. तर तुम्ही पुढील 20 वर्षांसाठी मोफत विजेचा लाभ घेऊ शकता.
पर्यावरणीय आणि इतर फायदे
पर्यावरणपूरक ऊर्जा: सौर ऊर्जेमुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते आणि प्रदूषण रोखण्यास मदत होते. कमी देखभाल खर्च (Low Maintenance): सोलर पॅनलला खूप कमी देखभालीची गरज असते, फक्त वेळोवेळी स्वच्छता करावी लागते. अखंड वीज पुरवठा: पॉवर बॅकअप (Inverter/Battery) सिस्टीम जोडल्यास लोडशेडिंगच्या समस्येपासून सुटका होते.

