Headlines

Sai Tamhankar : ‘त्यानं माझ्या कंबरेला पकडलं’, बसमध्ये मुलानं काढली छेड, सई ताम्हणकरनं चांगलीच घडवली अद्दल; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग


Sai Tamhankar On Bus Incident : सई ताम्हणकर सांगली ते मुंबई असा बसने प्रवास करत असताना बसमध्ये एका मुलानं तिची छेड काढलेली. याबद्दल सईनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं.

Sai Tamhankar On Bus Incident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. मात्र, सईचा हा प्रवास सोपा नव्हता. सांगलीतून येऊन सईनं स्वबळावर इंडस्ट्रीत आपलं स्थान मिळवलं. सई अनेक मुलाखतींमध्ये तिचे वैयक्तिक अनुभवही शेअर करते. अशातच एका मुलाखतीमध्ये सई ताम्हणकरनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. बसमध्ये प्रवास करताना एका मुलाने सईची छेड काढलेली. मात्र, अभिनेत्रीनं न डगमगता त्याला चांगलीच अद्दल घडवलेली.

सई ताम्हणकरनं सांगितला धक्कादायक प्रसंग

मुलाखतीदरम्यान सई ताम्हणकरला ‘पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा सामना करावा लागला आहे का?’ असं विचारलेलं. त्यावर अभिनेत्रीनं सांगितलं की, सांगली ते मुंबई प्रवास करत असताना एका व्यक्तीनं तिची छेड काढली होती. सई म्हणाली, ‘सुरुवातीच्या काळात मी बसने प्रवास करायचे. सांगली ते मुंबई असा माझा बसने प्रवास असायचा’.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

अभिनेत्रीनं घडवली अद्दल

‘रात्री मी बसमध्ये बसायचे. सकाळी ती बस मला मुंबईला सोडायची. प्रवास करत असताना माझ्या मागे एक मुलगा बसला होता. तो काही वेळ बघत होता. नंतर त्यानं मागून माझ्या कंबरेत हात घातला. मी तेव्हा खूप घाबरले. पण मी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. मी त्याचा हात ओढला आणि मुरगळला. जर पुन्हा हा हात पुढे आला तर, हात मोडून मिळेल, असं मी त्याला सांगितलं. त्या मुलाचा हात मुरगळल्यानंतर तो जोरात ओरडला. मी अशा गोष्टींबाबत बेधडक राहते’ असं सईनं शेवटी सांगितलं. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सई ताम्हणकर बोलत होती.

Maharashtra TimesGovinda : ‘ते कधीच प्रतिमेचा विचार करायचे नाहीत, संध्याकाळी दारू प्यायचे’, धर्मेंद्र आणि राजेश खन्नांबद्दल गोविंदाचं वक्तव्य
दरम्यान, सई ताम्हणकरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘दुनियादारी’, ‘गुलकंद’, ‘मिमी’, ‘तू ही रे’, ‘क्लासमेट्स’, ‘मानवत मर्डर्स’, ‘मटका किंग’यांसारख्या हिंदी मराठी सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी सईचा ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा प्रदर्शित झालेला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सईच्या भूमिकेचंही खूप कौतुक करण्यात आलेलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा