तुम्हीपण अशाच गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल, ज्यामध्ये तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित राहील आणि दर महिन्याला एक निश्चित रक्कमही मिळेल, तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) एक चांगला पर्याय असू शकतो.
काय आहे पोस्टाची POMIS योजना
सध्या या योजनेत वार्षिक 7.4 टक्के इतका व्याज मिळत असून यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यास तुम्हाला नियमित मासिक व्याज उत्पन्न मिळू लागते. तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि केवळ 5 वर्षांनंतर तुम्हाला भरीव मासिक उत्पन्न मिळेल.
पोस्टाच्या POMIS योजनेत गुंतवणूक कशी करायची?
या योजनेअंतर्गत एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख आणि संयुक्त खात्यात 15 लाख जमा करण्याची मुभा आहे. तसेच एक व्यक्ती एकापेक्षा जास्त POMIS अकाउंट उघडू शकते पण, एकूण गुंतवणूक विहित मर्यादेपेक्षा जास्त असू शकत नाही. एखाद्या गुंतवणूकदाराने 5 लाख जमा केले, तर त्याला 7.4% वार्षिक व्याजाने दरवर्षी अंदाजे 370000 रुपये मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक महिन्याला अंदाजे 3,083 रुपये व्याज मिळेल.
Property Transfer Rules: तुमची जमीन परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या नावावर होऊ शकते का? फेमा अन् राज्याचे कायदे समजून घ्याया योजनेअंतर्गत:
- एक प्रौढ व्यक्ती एक खाते उघडू शकते.
- 3 प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात
- पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडू शकतात.
- मानसिक आजारी व्यक्तीच्या वतीने पालक किंवा गार्डियन देखील खाते उघडू शकतात.
- 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची अल्पवयीन व्यक्ती देखील खाते स्वतःच्या नावाने चालवू शकते.
POMIS योजनेतून पैसा विड्रॉलचा नियम
या योजनेत पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, पण गरज पडल्यास मुदतीपूर्वीच खाते बंद केले जाऊ शकते. पण यासाठी काही नियम आहेत –
- खाते उघडल्यापासून एक वर्षाच्या आत पैसे काढता येणार नाहीत.
- तुम्ही एक वर्षानंतर आणि 3 वर्षांच्या आत खाते बंद केले, तर ठेव रकमेच्या 2% रक्कम कापली जाईल.
- तीन वर्षांनंतर पण 5 वर्षांच्या आत खाते बंद केले, तर 1% रक्कम कापली जाईल.
- या योजनेअंतर्गत मिळालेले व्याज पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा ECS द्वारे दरमहा बँक खात्यात हस्तांतरित करता येते. एका महिन्यात व्याज काढले नाही, तर त्यावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळत नाही.
New Tax Bill: किती वसूल करणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर शुल्क, युजर्सचा संताप; आता सरकारने दिले स्पष्टीकरण
तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये 10 लाख रुपये गुंतवले, तर सध्याच्या 7.4% रुपये वार्षिक व्याजदराने दरवर्षी अंदाजे 74,000 रुपये, म्हणजेच दरमहा अंदाजे 6,167 रुपये व्याज मिळेल. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून मुदतपूर्तीनंतर तुम्हाला तुमची संपूर्ण 10 लाख मुद्दल परत मिळेल, तर मासिक व्याजाचा वापर नियमित खर्च किंवा इतर गरजांसाठी केला जाऊ शकतो.
त्याचवेळी, त्याचप्रमाणे, एखाद्याने 5 लाख रुपये जमा केले, तर सध्याच्या व्याजदरानुसार दरमहिन्याला सुमारे 3,083 रुपये मिळू शकतात आणि 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमा केलेली मूळ रक्कमही परत केली जाईल.

