TDS on Property Buying: घर, फ्लॅट, प्लॉट किंवा अपार्टमेंट अशी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील मोठा आणि महत्तवाचा निर्णय मानला जातो. आजच्या काळात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता खरेदी करणे एक मोठी आर्थिक गुंतवणूक मानली जाते. अशा परिस्थितीत, खरेदीदारांनी काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे आणि खरेदी करण्यापूर्वी विक्री करार, मालकी हक्काची पडताळणी इत्यादी सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासण्याची याची खात्री करावी.
मालमत्ता खरेदीवर टीडीएसचा नवा नियम
मालमत्ता खरेदी करताना आवश्यक आणि योग्य खबरदारी घेतल्यास भविष्यातील कायदेशीर वाद टाळता येतात. याशिवाय खरेदीदारांना मालमत्तेवरील कर नियमही माहिती असली पाहिजे. नव्या आर्थिक वर्षापासून TDS नियम लागू झाले असून कोणताही संभाव्य दंड टाळण्यासाठी आपल्या आयकर नोंदींमध्ये या व्यवहाराची नोंद केली पाहिजे.
मालमत्ता खरेदीच्या नियमांमध्ये बदल केले गेले आहेत. आताच्या नव्या नियमानुसार एखादी व्यक्ती भारतातील रहिवाशाकडून जमीन, घर किंवा इमारत यांसारखी 50 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करत असेल, तर टीडीएस आकारला जातो. खरेदीदारांनी गुंतवणुकीतील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी टीडीएसशी संबंधित कर नियम पूर्णपणे समजून घेतले पाहिजे.
टीडीएस कपात करून सरकारकडे जमा करण्याची खात्री करणेही खरेदीदाराची जबाबदारी असून 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार असल्यास आयकर कायद्याच्या कलम 194-आयए अंतर्गत 1% टीडीएस कपात करणे अनिवार्य आहे. एकूण विक्री किमतीवर, पेमेंटच्या वेळी किंवा क्रेडिटच्या वेळी, यापैकी जे आधी असेल, हा टीडीएस लागू होतो.
भारतावर 100% टॅरिफला अमेरिकन खासदारांचाच विरोध; अमेरिकेला कसं परवडणार नाही याचं गणित मांडलंTax2Win वेबसाइटच्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन म्हणजे TAN अकाउंट नंबर आवश्यक नाही, पण खरेदीदारांना पॅन कार्डचा तपशील देणे अनिवार्य आहे. तसेच विक्रेत्याकडे पॅन नसेल, तर 1% ऐवजी 20% दराने टीडीएस कापला जाईल आणि लक्षात घ्या की टीडीएसचे कॅलक्युलेशन केवळ 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवरच नव्हे, तर संपूर्ण विक्री रकमेवर केली जाते.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा