Headlines

Pune Pregnant Woman Beaten Forced to Drink Dettol Suspected of Immoral Relations; पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलं


Pune Pregnant Woman Forced Dettol Drinking : एका २२ वर्षीय विवाहितेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सातत्याने अमानुष मारहाण केली.

Pune Pregnant Woman Forced Dettol Drinking
पुण्यात सुनेला डेटॉल पाजलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक अत्यंत संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळाच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत, मात्र या घटनेतील क्रूरतेने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. केवळ चारित्र्यावर संशय घेऊन एका गरोदर विवाहितेला तिच्या पतीने आणि सासूने चक्क ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, पुणे पोलिसांनी या प्रकरणाची तत्परतेनं दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात

या धक्कादायक प्रकरणाबाबत एका 22 वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे काळेपडळपोलीस ठाण्यात या क्रूर घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही कालावधीतच पीडितेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. या निराधार संशयातून त्याने तिला सातत्यानं अमानुष मारहाण केली तसेच तिचा अतोनात मानसिक व शारीरिक छळ केला. संशयाचं भूत एवढं मानगुटीवर बसलं होतं की, त्याने पत्नीच्या वेदनांची पर्वादेखील केली नाही.

Maharashtra TimesMumbai News : सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली

‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं

यात सगळ्यात हादरवून टाकणारी बाब म्हणजे, पीडिता गरोदर होती. गरोदरपणाच्या या अत्यंत नाजूक अवस्थेत कुटुंबाकडून आधाराची आणि प्रेमाची अपेक्षा असते. मात्र, या प्रकारणात परिस्थिती पूर्णपणे उलट होती. गरोदर असतानाही सासरच्या मंडळींच्या डोळ्यांत कोणतीही दयामाया दिसली नाही. त्यांनी संगनमत करून आणि बळजबरी करून या महिलेला ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडले. एका आईच्या आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या निरागस बाळाच्या जिवाशी खेळण्याचा हा भयंकर प्रकार अंगावर काटा आणणारा आहे.

Maharashtra TimesWashim Crime : नवऱ्याचे अनैतिक संबंध, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं, गर्भवती बायकोला संपवलं; मराठा बटालियनमध्ये कार्यरत जवानाचं संतापजनक कृत्य

आरोपींवर गुन्हे दाखल

या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आहेत. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी पती प्रतीक पिंगळे (वय 27) सासू वंदना सुनील पिंगळे (वय 45, दोघेही मूळ रहिवासी अक्कलकोट) या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुण्यात घडलेल्या या भयानक प्रकारामुळे कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सासरच्या छळाचं हे टोक गाठणारं प्रकरण समाजातील विकृत मानसिकतेचं दर्शन घडवणारं असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा