Washim Karanja Soldier Killed Wife : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच वाशिममधून एक संतापजनक घटना घडली आहे. मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

ज्ञानेश्वरचे बाहेर अनैतिक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जवानाचं दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, ज्यावरून घरात नेहमी वाद होत होते. काल दुपारी आरोपीने आपल्या पत्नीच्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील माहेरच्या लोकांना फोन करून दीपाली घरात पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल केल्याची खोटी माहिती दिली. संध्याकाळी दीपालीचे कुटुंबीय कारंजा येथे पोहोचले असता त्यांना दीपालीच्या शरीरावर संशयास्पद खुणा आढळल्या.
Pune Crime : शाळेपासून अफेअर, पण गर्लफ्रेण्ड पुण्यात मॅनेजरच्या प्रेमात पडली, 23 वर्षीय ‘एक्स’ने जीव घेतला, पोलिसांच्या धाडसाने हायवेवर धरपकड
यानंतर मृत महिलेचा भाऊ राहुल माने याने तात्काळ कारंजा शहर पोलीस ठाण्यात जाऊन मेहुण्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. अनैतिक संबंधांमुळे दीपालीचा सतत छळ केला जात होता आणि त्याच कारणावरून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी आरोपी जवान ज्ञानेश्वर मदने याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत’.
कुख्यात गुंडाचा वाठोड्यात खून
खुनाच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून आणि चाकूने वार करून हत्या करण्यात आली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस विद्यापीठामागील परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आदित्य ऊर्फ प्रतीक राजकरंडेकर (वय २४, रा. पारडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या युनिट-५ने अल्पवयीनासह तिघांना अटक केली असून, आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आवेज इक्बाल शेख (वय १८, रा. देशपांडे लेआउट), साकीब अब्दुल कलाम शेख (वय २६, रा. हिवरीनगर) आणि एका अल्पवयीनाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीब आणि आवेज यांच्याविरुद्ध यापूर्वी पोक्सोसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासानुसार, गुरुवारी रात्री आदित्य दोन मित्रांसह सिम्बॉयसिस विद्यापीठामागील रस्त्यालगत मद्यपान करत बसला होता. त्याचवेळी आरोपी गांजा ओढत असल्याचे पाहून आदित्यने त्यांना जाब विचारला. त्यातून वाद वाढून हाणामारी झाली. आदित्यच्या एका मित्राने आवेजवर चाकू उगारल्याचा आरोप आहे. यानंतर आवेजने आदित्यच्या डोक्यात दगड मारला. आदित्य खाली कोसळताच साकीब आणि अल्पवयीन साथीदाराने दगडाने मारहाण करून चाकूचे वार केले. यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
शुक्रवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्यानंतर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. समांतर तपास करत गुन्हेशाखेच्या युनिट-५ने पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आदित्यचा गेल्या नोव्हेंबरमध्ये एचबी टाउन परिसरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणात सहभाग होता. त्या गुन्ह्यात तो कारागृहात होता आणि दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.

