Headlines

America Wants to Imposed 100 Tariff On India Opposed By Senator Rand Paul


अमेरिकेच्या संसदेत Russia Sanctions Bill आणण्यात आला होता. अद्याप हा कायदा लागू झाला नसून त्यावर संसदेतील लोकप्रतिनिधी चर्चा करत आहेत. या बिलला अद्याप 86 लोकप्रतिनिधींचीच संमती मिळाली आहे. तसेच 11 खासदार विरोधात आहेत. रशिया सॅंक्शन बिलनुसार, रशियाच्या बाजारव्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात जोडलेल्या देशांवर 100% टॅरीफ लावण्यात येईल. अमेरिकेला रशियावर दबाव तयार करायचा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरु असल्याची चर्चा जगभरात आहे. रशियाकडून नॅचरल गॅस तसेच तेल खरेदी करणाऱ्या देशाच्या यादीत भारत आणि चीन पुढे आहे. त्यामुळे जर अमेरिकेने रशियन सॅंक्शन बिल मंजूर केला तर याचा थेट परिणाम भारतावरही होऊ शकतो. परिणामी, भारतीय कंपन्यांना अमेरिकेत माल एक्स्पोर्ट करण्यासाठी 100% टॅरिफचा सामाना करावा लागेल.

समजून घ्या 100% टॅरिफचं गणित

मुळात, एखाद्या देशासाठी अमेरिकेने कितीही टॅरिफ वाढवू द्या याचा सगळ्यात मोठा फटका अमेरिकन कंपन्यांना बसतो, कारण वाढवण्यात आलेला टॅरिफ आयात करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांनाच भरावा लागणारा अतिरिक्त कर आहे. समजा, अमेरिकेने भारतावर 100% टॅरिफ लागू केला. याचार्थ की ज्या भारतातून एक्स्पोर्ट झालेल्या वस्तूची किंमत 1000 रुपये आहे, त्या वस्तूसाठी अमेरिकन कंपन्यांना 100% टॅरिफमुळे 2000 रुपये भरावे लागणार आहे. जर वस्तूची किंमत 10,000 रुपये असेल तर त्या वस्तूसाठी अमेरिकन कंपन्यांना एकूण 20,000 रुपये मोजावे लागणार आहे. एकंदरीत, 100% टॅरिफमुळे अमेरिकन कंपन्यांना भारतातून एक्स्पोर्ट झालेल्या वस्तूसाठी दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे.

हे अमेरिकेसाठी ठरू शकतं नुकसानदायक

अमेरिकेने आणलेल्या रशियन सॅंक्शन बिलनुसार, रशियावर दबाव आणण्यासाठी रशियाच्या बाजारपेठेशी मोठ्या प्रमाणात जोडलेल्या देशांवर अमेरिका 100% टॅरिफ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यात फक्त एकट्या भारताचा समावेश नाही. रशियाच्या व्यवसायाशी सलंग्न देशांवर टॅरिफ वाढवण्यामागचा अमेरिकेचा हेतू म्हणजे रशियाशी व्यवसाय करण्यापूर्वी इतर देशांना दहा वेळा विचार करण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरून रशियाच्या बाजारव्यवस्थेवर दबाव निर्माण होईल. पण जर या सगळ्या देशांवर जर अमेरिकेने 100% टॅरिफ लावला तर अमेरिकन कंपन्यांनाही या सर्व देशांतून माल खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार करावे लागेल, कारण 100% टॅरिफमुळे या सगळ्या देशांतून आयात होणाऱ्या वस्तू अमेरिकन कंपन्यांना दुप्पट भावात मिळतील. 100% टॅरिफ करणे म्हणजे स्वतःच्याच अर्थव्यवस्थेला इजा करण्यासारखं ठरू शकतं.

भारतासाठीही ठरू शकतं नुकसानदायक

अमेरिकेने भारतावर 100% टॅरीफ लावला तर वस्तूंचा भाव दुप्पट झाल्याने अनेक अमेरिकी कंपन्या भारतासोबत व्यापार न करण्यासच प्राधान्य देतील. परिणामी, भारतीय बाजारव्यवस्थेला फार मोठा फटका बसेल. गेल्यावर्षी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात रशियन एनर्जी खरेदीच्या मुद्द्यामुळे भारतावर 25% टॅरिफ लावण्यात आला होता.

Maharashtra TimesIncome Tax Rule: पतीच्या मालकीचे घर खरेदी करून 7 कोटींचा कर वाचवणाऱ्या महिलेला अखेर कोर्टाकडून दिलासा, प्रत्येकासाठी धडा आहे हा खटला100% टॅरिफ म्हणजे अमेरिकेत महागाईची वाढ

जर अमेरिकन आयात करणाऱ्या कंपन्यांना एखादी वस्तू दुप्पट किंमतीत मिळत असेल तर ते नक्कीच त्या वस्तूची किंमत वाढवून ग्राहकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे देशामध्ये महागाई वाढेल. जर वस्तूची किंमत वाढवू शकले नाहीतर कंपन्यांना नफ्यात तडजोड करावी लागेल अन्यथा निर्यात करणाऱ्या कंपनीला माल आणखीन कमी भावात देण्याची विनंती करावी लागेल.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत