Headlines

Bert Mueller California Burrito Success Story; शिक्षणासाठी अमेरिकन तरुण भारतात आला अन् 22 व्या वर्षी मित्राकडून पैसे उसने घेऊन सुरू केला व्यवसाय; उभी केली 338 कोटींची ‘बुरिटो’ चेन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Bert Mueller founder of California Burrito: सातासमुद्रापारहून 22 व्या वर्षी अमेरिकन मुलगा भारतात आला आणि येथील लोकप्रिय बुरिटो चेन ‘कॅलिफोर्निया बुरिटो’चा मालक बनला. कंपनीचा वार्षिक महसूल 190 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Bert Mueller California Burrito Success Story
शिक्षणासाठी अमेरिकन तरुण भारतात आला अन् 22 व्या वर्षी मित्राकडून पैसे उसने घेऊन सुरू केला व्यवसाय
Success Story: कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पहिल्यांदाच भारतात आलेल्या अमेरिकन विद्यार्थ्याने पुढे जाऊन देशातील सर्वात मोठ्या मेक्सिकन क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट साखळींपैकी उभारली. कॅलिफोर्निया बुरिटोचे संस्थापक आणि सीईओ, बर्ट मुलरने भारतातील वास्तव्यादरम्यान सुचलेल्या कल्पनेला व्यवसायात रूपांतरित केले, ज्याने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 338 कोटी रुपयांचा महसूल कमावला आणि आता भारतातील 5 शहरांमध्ये 128 आऊटलेट्स चालवतो.

प्रवासी म्हणून भारतात आलेला बर्ट म्यूलर

प्रवासी म्हणून भारतात आलेला बर्ट म्यूलर

वयाच्या 22व्या वर्षी अमेरिकन बर्ट म्यूलरने दोन मित्र, एक शेफ आणि एका स्वप्नासह भारतात पाऊल ठेवले. आज म्यूलरचा ब्रँड, कॅलिफोर्निया बुरिटो, भारतात 100 हून अधिक रेस्टॉरंट्सच्या रूपात पसरला असून 23 दशलक्ष डॉलर्स (190 कोटी रुपये) वार्षिक महसूल कमावून दाखवला. संपूर्ण भारतात मेक्सिकन खाद्यपदार्थ लोकप्रिय करण्यात कॅलिफोर्निया बुरिटोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे बुरिटो लोकांच्या पसंतीस उतरले

वेगवेगळ्या प्रकारचे बुरिटो लोकांच्या पसंतीस उतरले

कॉलेजच्या एका कार्यक्रमानिमित्त भारताला भेट दिल्यावर म्युलरला कल्पना सुचली. म्यूलरने एका विद्यार्थ्याला भारतीय यजमान कुटुंबाला मेक्सिकन जेवण देताना पाहिले, जे सर्वांना खूप आवडले आणि इथूनच कॅलिफोर्निया बुरिटोची सुरुवात झाली. 2013 मध्ये बेंगळुरू येथे नऊ झालेल्या कॅलिफोर्निया बुरिटोने गेल्या दशकात सातत्याने विस्तार केला आणि स्थानिक आवडीनुसार बदल करून बनवलेले बुरिटो, टॅको, राइस बाऊल, नाचोज आणि इतर मेक्सिकन पदार्थ देऊन भारतातील फास्ट-कॅज्युअल डायनिंग क्षेत्रात एक प्रमुख स्थान मिळवले.

अशी सुचली व्यवसायाची कल्पना

अशी सुचली व्यवसायाची कल्पना

भारत भेटीदरम्यान जयपूरमध्ये यजमान कुटुंबांसोबत राहताना विद्यार्थ्यांनी आपापल्या देशांतील पदार्थ बनवून त्या कुटुंबांना खाऊ घातले. म्यूलरने अमेरिकन पदार्थ बनवले, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तर या दरम्यान मेक्सिकन वंशाच्या एका मैत्रिणीने टॉर्टिला, साल्सा, बीन्स आणि इतर मेक्सिकन पदार्थ बनवले, जे भारतीय कुटुंबांना खूप आवडले. इथूनच म्यूलरला एक व्यवसायाची कल्पना सुचली.

मित्रांनी थट्टा केली, मित्र-परिवाराकडून भांडवल उभारले

मित्रांनी थट्टा केली, मित्र-परिवाराकडून भांडवल उभारले

अमेरिकेला परतल्यावर बर्टने आपला आयडिया मित्रांना सांगितलं तेव्हा अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. काहींनी तर त्याला ‘ॲलिस इन वंडरलँड’मधील काल्पनिक कथा म्हटले, पण म्यूलरने हार मानली नाही. पहिले आउटलेट सुरू करण्यासाठी सुमारे एक लाख डॉलर्स लागतील असा म्युलरने अंदाज वर्तवला होता. मात्र, यातला धोका लक्षात घेऊन त्याने मित्र आणि कुटुंबीयांकडून सुमारे अडीच लाख डॉलर्स उभे केले, जो आयुष्यातील मोठा जुगार ठरला.

शिक्षण पूर्ण करून भारतात परतला

शिक्षण पूर्ण करून भारतात परतला

2011 मध्ये पदवी शिक्षण पूर्ण करून म्यूलरने सुरक्षित नोकरीवर समाधान मानले नाही आणि भारतात येऊन आपल्या कल्पनेला व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये 22 व्या वर्षी दोन बालपणीच्या मित्रांसोबत बेंगळुरूमध्ये ‘कॅलिफोर्निया बुरिटो’ सुरू केले. नंतर दोन्ही भागीदार अमेरिकेला परतले, पण म्यूलरने भारतातच राहून व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. हळूहळू बर्टला मेहनतीचे फळ मिळाले आणि बुरिटो चेन रेटोरेन्ट्स संपूर्ण भारतात विस्तारली. कोविड-19 काळात 37 पैकी 19 रेस्टॉरंट्स ठप्प पडली पण लॉकडाऊन उघडताच 2021 मध्ये पुन्हा उभारी घेतली आणि व्यवसायाची भरभराट केली. (प्रातिनिधिक फोटो)

व्यवसायाच्या सुरुवातीची आव्हाने पेलून घेतली झेप

व्यवसायाच्या सुरुवातीची आव्हाने पेलून घेतली झेप

मात्र बर्टसाठी हा प्रवास सोपा नव्हता. कंपनीला सुरुवातीच्या वर्षांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आणि सर्वात मोठी समस्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यामुळे होती. पुरवठादारांशी संगनमत करत होता आणि स्वतःचा प्रतिस्पर्धी व्यवसाय सुरू करण्याचाही प्रयत्न केल्याचे कंपनीला आढळून आले. त्या अनुभवाने बर्टला व्यवसायात लोकांची निवड करणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याच्या महत्त्वाचा आणि मौल्यवान धडा शिकवला. (प्रातिनिधिक फोटो)

पहिल्याच वर्षात प्रचंड परतावा

पहिल्याच वर्षात प्रचंड परतावा

कॅलिफोर्निया बुरिटोचे पहिले आउटलेट अपेक्षेपेक्षा खूपच जास्त यशस्वी ठरले आणि स्टोअरने पहिल्याच वर्षात जवळपास $500,000 चा महसूल मिळवला. यामुळे कंपनीला वेगाने विस्तार करण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि मिळालेल्या सुरुवातीच्या भांडवलातून आणखी दोन स्टोअर्स उघडली.

भरभराटीला आता व्यवसाय

भरभराटीला आता व्यवसाय

एका छोट्याशा आउटलेटपासून सुरुवात केल्यावर आता कॅलिफोर्निया बुरिटोने बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि चेन्नईमध्ये 128 रेस्टॉरंट्सपर्यंत विस्तार केला असून गेल्या काही वर्षांत या रेस्टॉरंट साखळीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. कंपनीच्या माहितीनुसार बुरिटोज, टॅकोज, राइस बाउल्स आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे ‘कॅलिफोर्निया बुरिटो’ने 2024-25 या आर्थिक वर्षात 338 कोटी रुपयांचा महसूल कमावला.

मेक्सिकन पदार्थांना भारतीय फोडणी

मेक्सिकन पदार्थांना भारतीय फोडणी

बर्टने पारंपारिक मेक्सिकन पदार्थ देण्याऐवजी भारतीय खाण्याच्या सवयींनुसार पदार्थांमध्ये बदल केले. कंपनीने शाकाहारी पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला, ज्यामध्ये पनीर हा बुरिटोज, टॅकोस, नाचोज आणि राईस बाउल्समधील सर्वात लोकप्रिय घटकांपैकी बनला. म्युलरने अनेकदा भारतीय आणि मेक्सिकन पाककृतींमधील साम्य अधोरेखित केले आणि तांदूळ, बीन्स व मका यांसारख्या मुख्य घटकांकडे लक्ष वेधले. मेनू अधिक सहजपणे समजण्याजोगा आणि जवळचा वाटावा यासाठी कंपनींतर्गत ‘टॉर्टिला’चे वर्णन ‘मक्याच्या चपात्या’ असेही केले जाते.