५ तास बैठक, तटकरेंवर नाराजी; प्रशांत किशोर – पार्थ पवार, सुनेत्रा पवार बैठकीत काय ठरलं? – prashant kishor meeting with sunetra pawar parth pawar inside story
५ तास बैठक, तटकरेंवर नाराजी; प्रशांत किशोर – पार्थ पवार, सुनेत्रा पवार बैठकीत काय ठरलं? – prashant kishor meeting with sunetra pawar parth pawar inside story
प्रशांत किशोर.. राजकीय रणनीतीकार..ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आणि आता ते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करणार असल्याचं बोललं जातंय. कारण ६ ऑगस्ट रोजी पार्थ पवारांसोबत चार्टड फ्लाइटनं प्रशांत किशोर हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांची सुनेत्रा पवारांसोबत तब्बल ५ तास बैठक झाली. प्रशांत किशोर – सुनेत्रा पवार यांच्या या बैठकीची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची दुसरी भेट आहे. याआधी प्रशांत किशोर यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे यापुढच्या काळात राष्ट्रवादीचे काम प्रशांत किशोर हे सांभाळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी, मित्रपक्षांचं वर्चस्व आणि विरोधकांकडून होणारी गुंगी गुडिया सारखी टीका मोडीत काढण्यासाठी आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार राजकीय रणनीतीकारांची साथ घेणार असल्याचं दिसतंय. या बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे, तेच या व्हिडिओत पाहू..