Headlines

चातुर्मास कीर्तनमालेत रविवारी विनोद सातार्डेकर यांचे कीर्तन


मालवण : श्री शिवाजी वाचन मंदिर, मालवण आयोजित चातुर्मास कीर्तनमाला २०२६ अंतर्गत रविवारी ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कीर्तनाचा विषय “कृष्ण भक्त मनसुख राम” असा असून, प्रख्यात कीर्तनकार श्री. विनोद सातार्डेकर हे कीर्तन सेवा सादर करणार आहेत. हा कार्यक्रम श्री दत्त मंदिर, भरड, मालवण येथे आयोजित करण्यात आला असून, चातुर्मास कीर्तनमालेच्या २०व्या वर्षातील २२वे पुष्प म्हणून हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.

या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी मालवण व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री शिवाजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत