Headlines

Chhatrapati Sambhajinagar News:महिला नवजात शिशू रुग्णालयाला मुहूर्त ? सर्वस्तरीय कामाला गती


Chhatrapati Sambhajinagar News: महिला आणि नवजात शिशू रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचे मुळ बांधकाम पूर्ण होऊन किमान दोन वर्षे लोटली.विस्तारीत कामासाठी १७४ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधी प्राप्त झालेला नाही.परंतु सद्यातरी रुग्णालय सुरू होण्याच्या दृष्टीने सगळी काम करण्यात येत आहे.

रुग्णालयाचे बांधकाम
म.टा. प्रतिनीधी, छत्रपती संभाजीनर: चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात जागेअभावी कॅथलॅब; तसेच ‘एमआरआय’च्या सोयी सुविधा सुरू झाल्या नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच महिला रुग्णालयात या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. अर्थात, महिला रुग्णालय सुरू झाल्यावर वर्षभरानंतर या सुविधा सुरू होतील, असे संकेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

दोन्ही रुग्णालयांची कामे ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत

दूध डेअरी परिसरातील २०० खाटांचे महिला आणि नवजात शिशू रुग्णालय तसेच २०० खाटांच्या एमसीएच विंगच्या कामाने गती घेतली असून, दोन्ही रुग्णालयांची कामे ही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याचे संकेतआहेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णालये सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामे आधी पूर्ण केली जात आहेत. त्यानंतर उर्वरित कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे समोर येत आहे.

बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

सद्यस्थितीत दोन्ही रुग्णालयांचे मूळ बांधकाम पूर्ण होऊन किमान दोन वर्षे लोटली आहेत. त्याच वेळी विस्तारित कामांच्या १७४ कोटींच्या निधीलाही नऊ जून रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली; परंतु अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. याच विस्तारित कामांमध्ये ओटी कॉम्प्लेक्स, आरसीसी पार्किंग, ऑक्सिजन प्लॅन्ट आदींचा समावेश आहे. साहजिकच निधी प्राप्त झाल्यानंतर या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे समजते. तोपर्यंत तरी दोन्ही रुग्णालये सुरू होण्याच्या दृष्टीने विद्युत कामे व विद्युत कामांशी संबंधित बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

Maharashtra TimesMissing Link Accident Video : भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू

कामे पूर्ण होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी

या दृष्टीने फॉल सीलिंग, फायर टँक, तसेच फर्निचर व इतर कामे केली जात आहेत. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणारआहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाच्या वतीने उर्वरित कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने २६ नोव्हेंबरची तारीख देण्यात आल्याचेही समजते.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News: गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवा ; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या बैठकीत सूचना

रुग्णालय सुरू होण्याच्या दृष्टीने सर्व कामे केली जात आहेत.

सद्यस्थितीत तरी रुग्णालय सुरू होण्याच्या दृष्टीने सर्व कामे केली जात आहेत. मात्र, निधीअभावी ओटी कॉम्प्लेक्स, ऑक्सिजन प्लँटचा विषय बाजूला पडण्याची चिन्हे आहेत आणि त्यामुळे महिला रुग्णालय ओटीविनाच सुरू होते की काय, अशीही शंका घेतली जात आहे. अशीच स्थिती राहिली तर शस्त्रक्रिया होणार कशा, असाही प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा