Headlines

‘तक्षाकुडू’मध्ये नितांशी गोयल


चित्रपट ‘लापता लेडीज’ फेम नितांशी गोयल स्वत:चा आगामी चित्रपट ‘तक्षाकुडू’वरून चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच सेटवरील अनेक छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये नितांशी हे वधूच्या वेषात दिसून येते, तर दुसऱ्या छायाचित्रात ती एका श्वानाला गोंजारत असल्याचे नजरेस पडते. तक्षकुडूच्या चित्रिकरणाचा प्रवास अत्यंत चांगला राहिला. सेटवर प्रत्येक दिनी मी नवे काही तरी शिकू शकले आहे. अनेक आठवणी निर्माण करता आल्या. चित्रपटातील स्वत:ची भूमिका कधीच विसरू शकणार नसल्याचे नितांशीने कॅप्शनदाखल म्हटले आहे. नितांशीचा हा आगामी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नितांशी यात ‘करुणा’ नावाच्या एका युवतीची भूमिका साकारत आहे. यात तिच्यासोबत आनंद देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. तर विनोट अनंतोजु यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नितांशी ही 2024 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘लापता लेडीज’मध्ये दिसून आली होती. यात तिने फूल कुमारी ही भूमिका साकारली होती, ज्याचे प्रचंड कौतुक झाले होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत