Headlines

Visitors Steal Plants Play in Fountain at New Andhra Airport Viral Video Sparks Outrage | ‘…म्हणून भारतामध्ये विकास होत नाही’, विमानतळाच्या उद्घाटनाला आले अन् झाडंच चोरून नेली, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात


Airport Fountain Video: आंध्र प्रदेशमध्ये एका नव्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी जमलेल्या लोकांनी चक्क सामूहिक चोरी केली. सजावटीसाठी लावलेली झाडं लोक काढून घेऊन गेले. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

ASR International Airport
(फोटो सौजन्य – @ThamizhTharmar, @IndianTechGuide/x.com)
भारतीयांमधील सिव्हिक सेन्स हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. कारण रस्त्यावर कचरा फेकणं, सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणं, फुटपाथवर गाडी चालवणं अशा अनेक चुकीच्या गोष्टी देशभरात अगदी सर्रास घडतात. आणि याच यादीमध्ये आता आणखी एका प्रकाराची भर पडली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विमानतळाच्या उद्घाटनासाठी जमलेल्या लोकांनी चक्क सजावटीची झाडं चोरून नेली. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. हा व्हिडिओ पाहून अनेकांना अर्शद वारसीचा प्रसिद्ध डायलॉग आठवतोय, “कौन हैं ये लोग, कहाँ से आते हैं?”

लोकांनी झाडं चोरून नेली

ही घटना आंध्र प्रदेशातील नव्याने सुरू झालेल्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. या घटनेचे व्हिडिओ @ThamizhTharmar आणि @IndianTechGuide यांसारख्या अनेक एक्स हँडलवरून शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, काही लोक सजावटीच्या कारंज्यात उतरून खेळत आहेत, तर काही जण विमानतळ परिसरातील सजावटीची झाडे काढून नेताना दिसत आहेत. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, लोकांच्या सिव्हिक सेन्सवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लोक कारंज्यात उतरून खेळत आहेत

हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी संतापले आहेत. कारण काही लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप केला जात आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे. असो, या घटनेवर प्रशासन काय कारवाई करतं हे तर काळच ठरवेल. पण या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा