Headlines

Moms Simple Request Brings Dozens of Supercars to 4 Year Olds Birthday in Florida Video Viral | श्रीमंतांनी दाखवली माणूसकी! ४ वर्षांच्या मुलासाठी उतरले रस्त्यावर, आईच्या एका पोस्टनं केली कमाल, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी


Sports Car Birthday Surprise: एका आईच्या हाकेवर चार वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी संपूर्ण शहर त्याच्या घरासमोर गोळा झालं. या घटनेतून माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. अमेरिकेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Sports Car Birthday
(फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram,MaximBady/facebook)
एका चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. या मुलाला स्पोर्ट्स कार खूप आवडतात. पण आर्थिक कारणांमुळे त्याच्या कुटुंबाकडे अशी महागडी कार नव्हती. मात्र, या मुलाच्या आईने हार मानली नाही. तिने आपल्या सोसायटीच्या सोशल मीडिया ग्रुपवर एक विनंती केली. “माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसानिमित्त स्पोर्ट्स कार प्रत्यक्षात कशी दिसते, हे पाहायचं आहे. हे गिफ्ट देणं आम्हाला शक्य नाही. पण जर कोणाकडे स्पोर्ट्स कार असेल, तर कृपया काही मिनिटांसाठी आमच्या घरासमोर या.” पाहता पाहता ही पोस्ट व्हायरल झाली आणि जवळपास संपूर्ण शहरच या मुलाच्या घरासमोर गोळा झालं. इतक्या विविध प्रकारच्या स्पोर्ट्स कार पाहून त्या मुलाने दिलेली प्रतिक्रिया पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत आनंदाश्रू येतील.

नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं?

हा व्हिडिओ sarika_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडली. आईने केलेली ही पोस्ट केवळ सोसायटीच्या ग्रुपपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती शहरभर व्हायरल झाली. संपूर्ण शहरातील लोक आपल्या स्पोर्ट्स कार घेऊन या मुलाच्या घरासमोर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले. या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे फेरारी, लँबॉर्गिनी, मर्सिडीज-बेंझ, पोर्शे, मॅकलारेन, बुगाटी, ॲस्टन मार्टिन, मासेराती, बेंटली, अल्फा रोमिओ, अल्पाइन, फोर्ड मस्टँग अशा एकापेक्षा एक महागड्या आणि आकर्षक कार या घरासमोर उभ्या होत्या. हा प्रकार पाहून मुलगा इतका आनंदी झाला की त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं.
(फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram)

नेटकऱ्यांच्या मनालाही स्पर्श

​ ​

हा व्हिडिओ ४० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे, “माणुसकी अजून जिवंत आहे.” तर काहींनी एका अनोळखी मुलाच्या वाढदिवसासाठी जमलेल्या सर्व स्पोर्ट्स कार मालकांना सलाम केला आहे. असो, हा प्रकार पाहून तुमच्या मनात कोणते विचार आले? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा