India vs Sri Lanka Warm-up : उद्या म्हणजे ७ ऑगस्ट पासून सुरु होणारा भारत-श्रीलंका वॉर्म-अप सामना किती वाजता सुरू होणार? टॉसची वेळ, टीव्ही आणि मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहता येणार, फ्रीमध्ये पाहता येईल का? जाणून घ्या.
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा एकमेव वॉर्म-अप सामना ७ ते ९ ऑगस्टदरम्यान खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने या सराव सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टॉस किती वाजता होणार, सामना कधी सुरू होणार, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार, तसेच फ्रीमध्ये पाहता येईल का, असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.
कुठे खेळवला जाणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा तीन दिवसांचा सराव सामना कोलंबोतील एनसीसी मैदानावर खेळवला जाणार आहे. सुरुवातीला हा सामना चार दिवसांचा ठेवण्यात आला होता. मात्र नंतर त्यात बदल करून तीन दिवसांचा करण्यात आला. दरम्यान, या सामन्यात प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही.
याशिवाय भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता टॉस होईल. त्यानंतर १० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दिवसाच्या तीन सत्रांमध्ये हा सामना खेळवले जाणार असून सर्व खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी देण्याची मुभा संघ व्यवस्थापनाला असणार आहे.
टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहणार?
या सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क्वर पाहता येणार आहे. तर मोबाईल किंवा इतर डिजिटल डिव्हाइसवर Sony LIV अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
जर तुमच्याकडे आधीपासूनच Sony LIV चे सबस्क्रिप्शन असेल, तर तुम्हाला सामना पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र सबस्क्रिप्शनची मुदत संपली असल्यास नवीन प्लॅन घ्यावा लागेल. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांसाठी सामना फ्री उपलब्ध नसेल तर त्यासाठी वैध सबस्क्रिप्शन आवश्यक असेल.
भारतासाठी हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. श्रीलंकेतील खेळपट्ट्या, हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खेळाडूंना ही उत्तम संधी असेल. तसेच अंतिम प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्यासाठी संघ व्यवस्थापनालाही या सामन्यातून महत्त्वाचे संकेत मिळणार आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा